लखनऊ : उत्तरप्रदेशात भाजपची पुन्हा बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. समाजवादी पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षानेही उत्तरप्रदेशात निवडणूक लढवली होती. परंतू शिवसेनेला NOTA पेक्षाही कमी मते मिळाल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 60 जागांवर उमेदवार उभे करू आणि 60 ही जागा 100 टक्के जिंकू असा विश्वास दाखवला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी स्वतः उत्तर प्रदेशात प्रचार केला होता.
अदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यासह थेट गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचा बालेकिल्ला आहे.
परंतू उत्तरप्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांना फक्त 0.02 % मते मिळाली आहे. ही मते कोणालाही मते नाही (NOTA)पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या उमेदवारांचे निवडणूक डिपॉझिट देखील जप्त होण्याची शक्यता आहे.