उन्नाव बलात्कार-अपघात : सीबीआयकडून कुलदीप सेंगरला मोठा दिलासा

जुलै महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात पीडितेच्या नातेवाईकांसहीत गाडी चालकाचा मृत्यू झाला होता

Updated: Oct 12, 2019, 03:50 PM IST
उन्नाव बलात्कार-अपघात : सीबीआयकडून कुलदीप सेंगरला मोठा दिलासा title=

लखनऊ : उन्नाव बलात्कार आणि अपघात प्रकरणात आमदार कुलदीप सिंह सेंगर याला मोठा दिलासा मिळालाय. सीबीआयनं उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणात आपल्या पहिल्या आरोपपत्रात भाजपाचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधार शुक्रवारी हत्येचे आरोप हटवलेत. 

जुलै महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात पीडितेच्या नातेवाईकांसहीत गाडी चालकाचा मृत्यू झाला होता. तर पीडिता आणि तिचे वकील गंभीररित्या जखमी झाले होते. या अपघातानंतर तिच्या काकामांनी कुलदीप सिंह सेंगर याच्यासहीत काही लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 

उन्नाव कांडः आज गांधीनगर में होगा ट्रक ड्राइवर और क्लीनर नार्को का टेस्ट, खुल सकते हैं कई राज
त्या अपघातानंतर... 

 

लखनऊमध्ये विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआयनं पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यात प्राथमिकरित्या आरोपी सेंगर आणि इतर सर्व आरोपींना कट रचने तसंच घाबरण्याचा प्रयत्न करण्यासाठी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार आरोपी बनवण्यात आलंय. 

कुलदीप सिंह सेंगर याच्या नऊ साथीदारांसहीत ट्रक चालक आशिष कुमार पाल याला आयपीएसीच्या कलम ३०४ ए, ३३८ आणि २७९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलाय.

ट्रक चालक आशिष कुमार पाल याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा ठेवत व्यक्तीच्या मृत्यूचं कारणं बनणं, एखाद्याचा जीव धोक्यात टाकून त्याला गंभीर इजा पोहचवणं, निष्काळजीपणानं वाहन चालवणं या कलमांखाली आरोपी बनवण्यात आलंय. मात्र, सीबीआयच्या आरोपपत्रात आशिष कुमार पाल याच्याविरुद्ध कट रचण्याचा आरोप लावण्यात आलेला नाही.