मुंबई : जगात अशी अनेक ठिकाणं असतात जिथे वेगवेगळ्या किंवा मग काही विचित्र गोष्टी होत असल्याचे आपण पाहतो. घरात असो किंवा मग घरातून बाहेर जायचे असो प्रत्येत व्यक्ती ही कपडे परिधान केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. पण असं एक गाव आहे जिथे सगळेच लोक निर्वस्त्र राहतात. आता तुम्हाला वाटतं असेल की तिथले लोक हे गरीब असतील पण असं काही नाही. दरम्यान, ही त्यांची एक परंपरा आहे. ब्रिटनचे हे एक सीक्रेट गाव (Unique Village) आहे, जिथे लोक गेल्या 90 वर्षांपासून निर्वस्त्र राहण्याची ही परंपरा पाळत आहेत.
मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, या गावात दोन बेडरूम असलेले बंगले आहेत. ज्या बंगल्यांती किंमत ही £85,000 म्हजेच जवळपास 82 लाख रुपये आहे. गावातील लोकांना मूलभूत सुविधांची कमतरता नाही, पण हे लोक परंपरा आणि श्रद्धेला मानणारे आहेत. त्यामुळे ते निर्वस्त्र राहतात. हर्टफोर्डशायरमधील (Hertfordshire) स्पीलप्लाट्झ (Spielplatz) गावात केवळ वृद्धच नाही तर लहान मुलेही निर्वस्त्र राहतात. (Spielplatz) याचा अर्थ जर्मनमध्ये खेळाचे मैदान.
हर्टफोर्डशायरमध्ये वसलेले हे गाव ब्रिटनमधील सर्वात जुन्या वसाहतींपैकी एक आहे. येथे फक्त चांगली घरे नाहीत, तर घरात आलिशान स्विमिंग पूल, लोकांना पिण्यासाठी बिअर अशा सुविधाही आहेत. गेली 90 वर्षांहून अधिक काळ इथले लोक असेच राहत आहेत.
स्पीलप्लाट्झ गावात जीवनाचा आनंद लुटणाऱ्यांमध्ये 82 वर्षीय इसेल्ट रिचर्डसन यांचा देखील समावेश आहे, ज्यांच्या वडिलांनी 1929 मध्ये या समुदायाची स्थापना केली होती. निसर्गवादी आणि रस्त्यावरील रहिवासी यांच्यात काही फरक नसल्याचं त्यांनी त्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
यावर जगभरातील लोकांनी अनेक डॉक्यूमेंट्री आणि शॉर्ट फिल्म बनवले आहेत. इथे शेजारच्या गावातील लोक, पोस्टमन आणि सुपरमार्केट डिलिव्हरी करणारे लोक येतात. या गावाचे नाव स्पीलप्लाट्झ आहे, म्हणजे खेळाचे मैदान.