Anurag Thakur : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येथे 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप येथे सत्तेत असून पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. हिमाचल प्रदेशमधील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ते सध्या राज्यातील विविध भागात जाऊन पक्षाची मते मागत आहेत.
हिमाचलच्या बिलासपूरच्या महामार्गावर एक बस जेव्हा बंद पडली. तेव्हा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा ताफाही या कोंडीमध्ये अडकला होता. मग काय स्वत: अनुराग ठाकूर गाडीत उतरले आणि त्यांनी गाडीला धक्का देऊन गाडी बाजुला करण्याचा प्रयत्न केला.
अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे स्टार प्रचारक आहेत. हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. अनुराग ठाकूर यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच त्यांचा हा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
#WATCH | Union Minister Anurag Thakur was seen pushing a bus that broke down in the middle of a highway causing a traffic jam in Himachal's Bilaspur.
The Minister's convoy was also stuck in traffic pic.twitter.com/2EPNLKGSJb
— ANI (@ANI) November 8, 2022
माहिती आणि प्रसारण मंत्री ठाकूर हे हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत. यावेळी काँग्रेसवर ते जोरदार टीका करत आहेत.