जम्मू-काश्मीर मुद्यावर गृहमंत्री शाहांची बैठक सुरू, मोठा निर्णय घेणार?

अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे

Updated: Jul 30, 2019, 10:44 AM IST
जम्मू-काश्मीर मुद्यावर गृहमंत्री शाहांची बैठक सुरू, मोठा निर्णय घेणार? title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे महासचिव बीएल संतोष यांच्यासह प्रदेश कोअर समितीचे सदस्य या बैठकीत सहभागी होतील. गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर आज एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमधल्या भाजपाच्या कोअर समितीची केंद्रीय नेतृत्वासह आज बैठक होतेय. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. बैठकीत जम्मू-काश्मीरचे भाजप अध्यक्ष रवींद्र राणा, माजी उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता, राम माधव, जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. कोअर समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह देखील सहभागी आहेत.

अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. ३ जुलैला आणखी सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यात आली.