Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?

Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: वयाच्या आधारे सर्व व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, असे 3 स्लॅब पडतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 05:02 PM IST
Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय? title=
दर अर्थ संकल्पामध्ये टॅक्स स्लॅबची सर्वाधिक चर्चा असते

Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: दरवर्षी अर्थसंकल्पाचा आठवडा म्हटलं की नोकरदार वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असते ती टॅक्स स्लॅबची. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागील वर्षी म्हणजेच अर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला होता. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच कंपन्यांकडूनही आयकर आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच एचयूएफ तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, एलएलपी आणि कॉर्पोरेट्सच्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक करासंदर्भात बोलायचं झाल्यास कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा अधिक असेल तर कर विवरणपत्र भरावे लागते. तसेच त्यांना टॅक्स स्लॅबप्रमाणे सर्वसामान्य करदात्यांना कर भरणे आवश्यक असते. वयाच्या आधारे सर्व व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, असे 3 स्लॅब पडतात. मात्र दरवर्षी बजेटमध्ये यापैकी पहिल्या स्लॅबमधील करपात्र उत्पन्न किती याबद्दल कमालीची उत्सुकता नोकरदार वर्गांमध्ये असते. सध्याच्या करप्रणालीनुसार म्हणजेच 2023-24 च्या अर्थसंकल्पानुसार टॅक्स स्लॅब कसे आहेत पाहूयात...

टॅक्स स्लॅब कसे आहेत पाहूयात...

नवीन टॅक्स स्लॅब नुसार करप्रणाली खालील प्रमाणे असणार आहे.

Income               Tax  
0 ते 3 लाख            0 %
3 ते 6 लाख             5 %
6 ते 9 लाख            10 %
9 ते 12 लाख          15 %
12 ते 15 लाख         20 %
15 लाखांपेक्षा जास्त  30 %

HUF अंतर्गत जुन्या करप्रणालीनुसार खालीलपद्धतीने टॅक्स स्लॅब आहेत

2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर कर भरावा लागत नाही.

2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 5 टक्के आयकर भरावा लागतो.

5 लाख ते 7 लाख 50 हजारांपर्यंत उत्पन्न असेल तर 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 10 टक्के आयकर + 12 हजार 500 रुपये भरावे लागतात.

7 लाख 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर 7.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 15 टक्के आयकर + 37 हजार 500 रुपये भरावे लागतात.

10 लाख ते 12 लाख 50 हजारांपर्यंत उत्पन्न असेल तर 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 20 टक्के आयकर + 75 हजार रुपये भरावे लागतात.

12 लाख 50 हजारांपासून 15 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 12.5 लाखांवर 25 टक्के आयकर + 1,25,000 हजार रुपये भरावे लागतात.

नवीन टॅक्स स्लॅबमध्ये कोणते फायदे मिळतात?

  • भाड्यावर होणार डिडक्शन..
  • शेतीचे उत्पन्न.
  • PPF वर मिळणारे व्याज.
  • विम्याची म्युच्योरिटी रक्कम.
  • रिटायरमेंट वर लिव्ह इन्कॅशमेंट.
  •  मृत्यूनंतर विम्याची मिळणारी रक्कम. 
  • सेवानिवृत्तीवर रोख रक्कम  
  • VRS म्हणजे स्वेच्छानिवृत्ती.
  • सुकन्या समृद्धी खात्यावर मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम.

जुन्या टॅक्स स्लॅबवर कोणते फायदे मिळतात?

  • होम लोनमधील प्रिसिंपल आणि व्याज
  • PPF आणि EPF मधील गुंतवणूक
  • ठेवींवरील व्याज उत्पन्न
  • मुदत ठेवीतून उत्पन्न
  • मुलांची शिक्षण फी
  • पगारदार कर्मचार्‍यांसाठी 50,000 रु.ची स्टॅंडर्ड डिडक्शन
  • एलटीए म्हणजे रजा प्रवास भत्ता
  • घर भाडे भत्ता
  • वैद्यकीय आणि विमा खर्च
  • 80 डीडी दिव्यांगांच्या उपचारांवर कर सूट
  • 80U अंतर्गत दिव्यांगांच्या खर्चावर कर सूट
  • शैक्षणिक कर्जावर 80e कर सूट
  • कलम 16 - करमणूक भत्ता
  • 80 GG घराच्या भाड्यावर सूट
  • 80G - देणगी (दानावर सूट)
  • 80 EEB - इलेक्ट्रिक वाहनावरील कर सवलत