ना नोकरी, ना घर आणि ना गाडी... जाणून घ्या कसा खर्च चालवतो 'बेरोजगार' कन्हैया कुमार

कसं चालवतो कन्हैया आपलं घर 

Updated: Sep 29, 2021, 11:40 AM IST
ना नोकरी, ना घर आणि ना गाडी... जाणून घ्या कसा खर्च चालवतो 'बेरोजगार' कन्हैया कुमार  title=

मुंबई : जेएनयू (JNU) छात्र संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय (CPI) नेता कन्हैया कुमार  (Kanhaiya Kumar)ने काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केलाय. मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमारने प्रवेश केला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर कन्हैया कुमारबाबत चर्चा होत आहे. कन्हैया कुमारच्या संपत्तीबाबत जाणून घेण्यास सोशल मीडियावर प्रेक्षक उत्सुक होते. 

18 करोडचा मालिक आहे कन्हैया कुमार?

याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमारच्या मालमत्तेसंदर्भात बराच वाद झाला होता. त्यानंतर असा दावा करण्यात आला की कन्हैया कुमारकडे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नाहीत, असे असूनही त्याची संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

कन्हैया कुमारची एकूण संपत्ती 

2019 मध्ये बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैया कुमारने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: ला बेरोजगार घोषित केले होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार त्यांच्याकडे एकूण 6 लाखांची संपत्ती होती.

कन्हैया कुमार असा चालवतो खर्च 

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कन्हैया कुमारकडे ना घर आहे ना कार. बेगुसरायमधील बेहाट गावात त्यांची एक छोटीशी जमीन आहे, तीही त्यांना वारशाने मिळाली आहे. कन्हैया कुमार म्हणतो की त्याच्यासाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे त्याने लिहिलेल्या 'बिहार ते तिहार' या पुस्तकातील रॉयल्टी.