मुंबई - दिल्लीत कोरोनाचा वेगाने संसर्ग, महाराष्ट्रात 364 डॉक्टरांना लागण

Coronavirus Cases : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या  (Coronavirus ) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. 

Updated: Jan 8, 2022, 07:33 AM IST
मुंबई - दिल्लीत कोरोनाचा वेगाने संसर्ग, महाराष्ट्रात 364 डॉक्टरांना लागण title=

मुंबई :  Coronavirus Cases : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या  (Coronavirus ) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र ही राज्ये कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. यात डॉक्टर लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 3६४ डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत 20 हजारांहून अधिक रुण सापडले

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही शुक्रवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1395 कोरोना रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 35 हजारांहून अधिक कोरोना बेड्स तयार करण्यात आले असून त्यापैकी 6532 खाटा वापरात आहेत.

कोरोनामुळे मुंबईतील 123 हून अधिक इमारती सील करण्यात आल्या असून सध्या येथे 6 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात सुमारे 364 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 

दिल्लीत 8 महिन्यांचा विक्रम मोडला

शुक्रवारी दिल्लीत कोरोनाचे 17335 रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर संसर्ग दर 17.73 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीने कोरोना प्रकरणाचा सुमारे 8 महिन्यांचा विक्रम मोडला आहे.  कोरोनाचा संसर्ग दर देखील सुमारे 8 महिन्यांतील सर्वोच्च आहे. दिल्लीतील संसर्ग रेट कालचा 11 मे नंतर सर्वाधिक आहे.

सक्रिय कोरोना प्रकरणांबद्दल बोलायचे झाल्यास, ही संख्या 39,873 वर पोहोचली आहे. जी सुमारे साडेसात महिन्यांतील सर्वाधिक आहे. २० मे नंतर दिल्लीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 26 जूनपासून एका दिवसात मृत्यू झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. दिल्लीत आता 20,695 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
 

संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. याअंतर्गत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ७ दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात येणार आहे. यासोबतच आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणीही आवश्यक करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे आणि नवीन प्रकार पाहता आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राची ही मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून लागू होणार आहेत.