नवी दिल्ली : पॅन कार्ड, पासपोर्ट बनविण्यासाठी आपण खूप दिवस घालवतो. कस अप्लाय करायच, किती दिवसात येईल, बनवणार कोणी ओळखीच आहे का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.
थोडक्यात काय, तर अशा गोष्टींसाठीही आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. पण आता यापुढे असे करण्याची गरज नाही.
तुम्ही घरी बसूनही अशी कामे करु शकता. अशी कामे करण्यासाठी वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. मोदी सकारचे हे अॅप तुमच्या चांगलच कामात येणार आहे.
केंद्र सरकारने वैश्विक सायबर स्पेस संम्मेलनात उमंग अॅप लॉंच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक सरकारी सेवा देता.
सायबर सुरक्षेसंदर्भात होणाऱ्या या संम्मेलनात १० हजार पेक्षा जास्त विशेषतज्ञ, अधिकारी आणि मंत्री सहभागी होणार आहेत.
काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेही यात सहभागी होतील.सायबर सुरक्षेला मजबूत बनविण्यासाठी अभ्यासक आपले मत मांडणार आहेत.
हे अॅप आपल्या आरोग्य, शिक्षण, गॅस बुकिंग, पेंशनसहीत अनेक सुविधा देते. या माध्यमातून तुम्हाला आधारची माहितीही मिळेल. तसेच यासंबंधी जोडलेली अनेक कामे होऊ शकतील.
भारत, इंडेन आणि एच.पी अशा कोणत्याही कंपनीचा तुमचा घरगुती गॅस असेल तरीही वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.या अॅप मधून तुम्ही सहजरीत्या कोणत्याही कंपनीचा गॅस बुक करु शकता.
पासपोर्टसंबंधी कोणतेही काम करु इच्छित असाल तर या अॅपने ते सहज पार पडेल. यामाध्यमातून तुम्ही पी.एफ कॉंट्रीब्यूशन आणि यासंदर्भातील माहिती मिळवू शकता.
जर तुमचे ड्रायविंग लायसन्स डिजिटल लॉकरमध्ये असेल तर या अॅपच्या मदतीने ते डाऊनलोडही करु शकता.
उमंगच्या (युनीफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नंस) माध्यमातून केवळ पासपोर्ट आणि पॅन कार्डच नाही तर गॅस सिलिंडर बुकिंग सारखी अनेक कामे करु शकता.