नवी दिल्ली : आधार कार्डची जागा आजपासून व्हर्च्युअल आधार कार्ड घेणार आहे. आधार कार्डच्या सुरक्षेबाबात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावर यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरीटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधारबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली. या बदलानुसार, यापुढे व्हर्च्युअल आयडीचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे विविध योजना, सुविधांचा लाभ घेताना ग्राहकाला आपला आधार नंबर देणे बंधनकारक असणार नाही. मात्र, व्हर्च्युअल आयडी आता काम करणार आहे. तसेच बारकोडचा उपयोग केला जाणार आहे. ज्यामुळे आधार कार्डवरची सुरक्षा अबाधित राहणार आहे.
आधार कार्डचा १२ अंकी ऐवजी व्हर्च्युअल आयडी १६ अंकांचा असेल. दमम्यान, आधार कार्डचा डाटा सुरक्षित नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसे आरोप होत होते. त्यामुळे यूआयडिएआयने व्हर्च्युअल आयडीचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुन्ही कितीही व्हर्च्युअल आयडी काढू शकता. नवीन व्हर्च्युअल आयडी काढताना पहिला आयडी आपोआप रद्द होईल.
- सध्या जे आधार कार्ड आहे, त्यात एकूण १२ अंक असतात. मात्र व्हर्च्युअल कार्डमध्ये १६ अंक असतील.
- कोणीही नागरिक यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन (https://uidai.gov.in) आधिच्या आधार कार्डच्या माहितीवरुन व्हर्च्युअल आयडी बनवू शकतो. ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड आहे, त्यांनाच हे शक्य आहे. तसेच ज्यांचा मोबाईल आधारशी लिंक आहे, त्यांना ते शक्य आहे.
- १६ अंकांचं हे व्हर्च्युअल आयडी ठराविक वेळेपुरते मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्युअल आयडी बनवावे लागेल. एकावेळी एकच आयडी बनवणं शक्य असेल, जुन्या आयडीची मुदत संपल्यानंतरच नवीन बनवू शकतात.
- व्हर्च्युअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. त्यापलिकडे माहिती या कंपन्यांना दिली जाणार नाही.
- आधार कार्ड ज्याप्रमाणे ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं, त्याच धर्तीवर व्हर्च्युअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते.
- जिथे कुठे ओळखपत्राची आवश्यकता असेल किंवा केवायसी करायचं असेल, तिथेही व्हर्च्युअल आयडी स्वीकारले जाईल.
- जून २०१८ पासून व्हर्च्युअल आयडीचा वापर केला जाणार आहे. तो अनिवार्य असणार आहे. ज्या यंत्रणा या व्हर्च्युअल आयडीच्या दृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
दरम्यान, आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मात्र यूआयडीएआयने केला आहे. ती माहिती लीक होणे शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र तरीही खासगी सुरक्षेचे कारण पुढे करत यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे.
- व्हाआयडी काढण्यासाठी यूआडीएआयच्या होम पेजवर जा
- आता तुमचा आधार नंबर टाका। त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका आणि सेंड ओपीडीवर क्लिक करा
- जो नंबर तुमचा आधारशी रजिस्टर्ड असेल त्याचा पर्याय तुम्हाला मिळेल।
- ओपीडी टाकल्यांतर आपल्याला नवीन व्हर्च्युअल आयडी काढावा लागेल, याचा पर्यात तुम्हाला मिळेल
- ज्यावेळी व्हर्च्युअल आयडी तयार होईल त्यावेळी मोबाईलवर आपला व्हर्च्युअल आयडी पाठविला जाईल। हा १६ अंकांचा नंबर असेल।