आधार : प्रायव्हसी सुरक्षीत ठेवण्यासाठी UIDAIने आणली नवी टू-लेयर सुरक्षा प्रणाली

आधार कार्डच्या वापराबाबत मोठा बदल, लोकांना द्यावा लागणार नाही ओळख क्रमांक

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 10, 2018, 06:32 PM IST
आधार : प्रायव्हसी सुरक्षीत ठेवण्यासाठी UIDAIने आणली नवी टू-लेयर सुरक्षा प्रणाली title=

नवी दिल्ली: आधार कार्डच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावर यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरीटी ऑफ इंडियाने(UIDAI) आधारबाबत महत्त्वपूर्ण बदल बुधवारी (१०, जानेवारी) जाहीर केले. या बदलानुसार, यापुढे व्हर्च्युअल आयडीची सुरूवात केली जाईल. त्यामुळे विविध योजना, सुविधांचा लाभ घेताना ग्राहकाला आपला आधार नंबर देणे बंधनकारक असणार नाही. याशिवाय क्रिप्टिक बारकोडचाही उपयोग केला जाईल. ज्यामुळे  आधार कार्डवरचा ओळख क्रमांक सुरक्षीत रहाण्यास मदत होईल.

'UIDAI'ने 'आधार' यंत्रणा केली अधिक मजबूत

सोबतच 'आपल्या ग्राहकाला ओळखा' ही सुविधाही देण्यात येईल. ज्यात एजन्सीसोबत जोडलेले एक युआडयडी टोकन तयार होईल. ज्यात आवश्यक नसेल त्या ठिकाणी आधार कार्ड देण्याची अजिबात आवश्यकता असणार नाही. 'UIDAI'ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सध्यास्थितीत आधारच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित आहेत. यावर लक्ष केंद्रीत करून 'UIDAI'ने आधार यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात ११९ कोटी आधार कार्ड तयार झाली आहेत. ज्याचा बॅंक, टेलिकॉम, सार्वजनिक सरकारी योजना आणि आयकर विभाग आदी ठिकाणी प्रामुख्याने वापर केला जात आहे. 

UIDAI: व्हर्च्युअल आयडीची नक्कल करता येणार नाही

दरम्यान, नव्या प्रक्रियेनुसार १६ अंकी स्थीर आयडी तयार होईल. जी आधार क्रमांकाने निर्माण होईल. यामुळे आधार कार्डधार व्यक्तिसाठी महत्त्वपूर्ण बाब अशी होईल की, कोणत्याही यंत्रणेला संबंधीत व्यक्तीचा आधार नंबर काढता येणार नाही, असा दावा 'UIDAI'ने केला आहे. व्हर्च्युअल आयडीचा शेवटचा क्रमांक असलेली आधार संख्या अल्गोरिदद्वारे तयार होईल. कोणत्याही वेळी आधारद्वारे एकच व्हर्च्युअल आयडी निर्माण होऊ शकेल. महत्त्वाचे की, व्हर्च्युअल आयडीची नक्कल करता येणार नाही, असेही 'UIDAI'ने म्हटले आहे.