Crime News : महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच अनुत्तरित असतो. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिला अत्याचाराला बळी पडतात. असचं एक धक्कादाय कृत्य Uber च्या महिला ड्रायव्हरसह घडले आहे. अज्ञात तरुणांनी या महिलाड्राव्हर हल्ला केला आहे. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ही घटना घडली आहे. यामुळे दिल्ली शहर महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
9 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. एका ग्राहकाने ऑनलाईन Uber कार बुक केली होती. ही महिला ड्रायव्हर Uber कार घेऊन कश्मीरी गेट ISBT कडे जात होती. धुके असल्यामुळे ही महिला ड्रायव्हर हळू कार चालवत होती. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या कारवर दगडफेक करत हल्ला केला. यामुळे या महिलेने कार तात्काळ थांबवली.
कार थांबवल्यानंतर हल्लेखोर या महिलेच्या जवळ आले. यांनी या महिलेचा मोबाईल फोन हिसकावला. यानंतर त्यांनी तिच्याजवळचे पैसे लुटले. या महिलेने त्यांना विरोध करत आरडा ओरडा केला. यानंतर आरोपींनी बियरची बॉटल फोडली आणि याच्या काचेने महिलेच्या मानेवर आणि छातीवर वार केले. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. तिला दहा टाके पडले आहे.
जखमी अवस्थेत महिलेने पोलिसांना फोन केला. महिलेच्या फोननंतर अर्ध्या तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनीच या महिलेला रुग्णालयात नेले. कश्मीर गेट पोलिस ठाण्यात या प्करणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भर रस्त्यात महिलेवर हल्ला झाला आहे. रात्रीच्या वेळी पोलिस पेट्रोलिंग करत नव्हते का? पोलिसांना घटनास्थळी दाखल होण्यास विलंब का झाला? आरोपींना अद्याप अटक का झालेली नाही.
दिल्लीतील कांजवाला प्रकरणामुळे देश हादरला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली नावाची तरुणी आणि तिची मैत्रीण निधी या दोघी स्कूटीवरून घराकडे निघाल्या होत्या. तेव्हा कांजवाला रस्त्यावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. निधी या धडकेतून वाचली, मात्र अंजली कारखाली अडकली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तरुणांनी अंजलीला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.