daud ibrahim location information: मनी लॉन्ड्रिंग, जमीन बळकावणे, आणि दहशतवादी संघटनांसोबत कारवाई केल्याचे आरोप दाऊदवर आहेत..त्याच्यावर लष्कर-ए-तैयबा(Lashkar-e-Taiba), जैश-ए-मोहम्मद(Jaish-e-Mohammed) अल कायदा(Al-Qaeda) यासारख्या दहशतवादी संघटनांशी सक्रियपणे संबंध असल्याचा आरोप होता.
अलीकडेच एनआयएने याच प्रकरणात मुंबईतून सलीम फ्रूटलाही अटक केली होती.त्याला पकडण्यासाठी आता एनआयए NIA सक्रिय झाली आहे . यासंदर्भात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान याप्रकरणी एनआयएने या सर्व कुख्यात दहशतवाद्यांवर इनाम जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमवर 25 लाख, छोटा शकीलवर 20 लाख आणि अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा(1993 Bombay bombings) मास्टरमाईंड आहे.
दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरी(DONGARI) इथे झाला होता ,भारतात दहशतवादी कारवाया केल्यानांतर भारत सोडून गेला होता सध्या तो ;पाकिस्तानातील पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो.
भारत आणि अमेरिकेने(india and america) 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’(international terrorist') घोषित केले आहे.