घरबसल्या मोबाईलमधून कमवा हजारो रुपये

तुमच्या टायपिंग स्पीडनुसार तुम्ही पैसे कमाऊ शकता. 

Updated: Jan 11, 2019, 10:53 AM IST
घरबसल्या मोबाईलमधून कमवा हजारो रुपये  title=

मुंबई : पैसे कमावण्यासाठी अनेकजण बऱ्याच क्लृप्त्या लढवत असतात. मग वेगवेगळ्या स्किममध्ये पैसे गुंतवणे असो किंवा घरदार सोडून दूर जाऊनही पैसे कमावले जातात. पण जर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही घरबसल्या हजारो, लाखोंची कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटचीही गरज लागणार नाही. यासाठी तुम्हाला Captcha भराला लागेल आणि तुमच्या कमाईला सुरूवात होईल. यामध्ये वेळेचे कोणतेही बंधन नाही. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा टायपिंग करुन पैसे कमाऊ शकता. तुमच्या टायपिंग स्पीडनुसार तुम्ही पैसे कमाऊ शकता.

काय आहे Captcha ?

Image result for money zee news

Captcha एक कॉंम्यूटर प्रोग्राम किंवा सिस्टिमचा असा प्रोग्राम आहे ज्याला सर्वसाधारण माणूस आणि मशीन इनपुट यांच्यातील फरक कळतो. स्पॅमपासून वाचवणे हे याचे मुख्य कार्य आहे. आपण अनेक साईटसवर आपल अकाऊंट बनवतो किंवा लॉग इन करतो तेव्हा खाली एक ईमेज दिसते. त्यामध्ये काहीतरी कोड असतो जो दिलेल्या बॉक्समध्ये भरायचा असतो त्यानंतरच ते लॉग इन पूर्ण होते. तुम्हाला खूप सारे Captcha दिले जातील आणि ते सोडवण्यासाठी 15 सेकंदाचा वेळही दिला जाईल. हे सोडवल्यावर तुम्हाला पैसे मिळतील. 

तुम्हाला गुगलवर अशा अनेक साईट्स मिळतील जिथे हे काम केले जाते. यासाठी तुम्हाला स्वत:चे अकाऊंट बनवावे लागेल. यानंतर मिळालेल्या युझर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.  तुम्हाला सर्व वेबसाईट्समध्ये Captcha सोडवण्याची पद्धत सांगितली जाईल. यातून योग्य पद्धत शिकून घ्यावी लागले. कारण चुकीच्या पद्धतीने Captcha भरल्यास पैसे कापून घेतले जातात. 
 
जर कोणताही Captcha समजत नसेल तर स्टॉप वर क्लिक करुन तुम्ही पुन्हा स्टार्ट करु शकता. याव्यतिरिक्त सर्व वेबसाईटवर तुमच्या मित्रांना इन्वाईट करुन Captcha तून पैसे कमाऊ शकता.

असे मिळेल पेमेंट 

Image result for mobile payment zee news

कमावलेली रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला Paypal आणि Payza वर अकाऊंट बनवावे लागेल. कारण जास्तीत जास्त वेबसाईट या माध्यमातूनच पेमेंट करत असतात. MegaTypers, CaptchaTypers, ProTypers,Captcha2Cash, 2Captcha,Qlinkgroup, VirtualBee अशा अनेक वेबसाईट्सवर लॉग इन करुन तुम्ही हजारोंची कमाई करु शकता.