Tyre Design New Rule: 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाइनसह टायर बनवले जाणार, सरकारने जारी केला आदेश

वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय केला आहे. वाहनांच्या टायर्सच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे.

Updated: Jun 29, 2022, 05:16 PM IST
Tyre Design New Rule: 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाइनसह टायर बनवले जाणार, सरकारने जारी केला आदेश title=

Tyre Design New Rule: देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालय विविध उपाययोजना करत आहे. यापूर्वी गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. आता वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय केला आहे. वाहनांच्या टायर्सच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली असून, 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाईननुसार टायर बनवण्यात येणार आहे. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. वाहनांचे टायर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहावेत यासाठी असे करण्यात आले आहे. या नियमांतर्गत सर्व प्रकारचे टायर समाविष्ट असतील. यामध्ये C1, C2, C3 श्रेणीतील टायर्सचा समावेश करण्यात आला असून या तिन्ही श्रेणींसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

काय आहेत सरकारचे नवे आदेश?

  • 1 ऑक्टोबर 2022 पासून टायर डिझाइनसाठी नवीन नियम
  • C1, C2, C3 श्रेणीसाठी AIS-142:2019 स्टेज 2 टायर्ससाठी अनिवार्य
  • 1 एप्रिल 2023 पासून नवीन गाड्यांमध्ये अनिवार्य 
  • मोटार वाहन कायद्यातील दहाव्या दुरुस्तीची अधिसूचना जारी
  • रोलिंग रेजिस्टेंस, वेट ग्रिप आणि रोलिंग साउंड इमिशनसाठी नवीन मानके
  • AIS - ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड

नवीन आदेश काय म्हणतो?

नवीन मानकांनुसार, वाहनांच्या टायर्सची गुणवत्ता आणि डिझाइन आता AIS-142:2019 नुसार असेल. रस्त्यावरील घर्षण, ओल्या रस्त्यावरील पकड आणि वेगावर नियंत्रण तसेच वाहन चालवताना होणारा आवाज यानुसार नवीन टायर सुरक्षित करावे लागतील. याद्वारे ग्राहकाला खरेदी करताना टायर किती सुरक्षित आहे हे कळू शकते.

स्टार रेटिंगही लवकरच जाहीर होईल

परिवहन मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालय लवकरच टायर्ससाठी स्टार रेटिंग सुरू करणार आहेत. रेटिंग पाहून ग्राहकाला त्याच्या वापरानुसार सर्वोत्तम आणि सुरक्षित टायर निवडण्यास मदत होईल.