Indian Railways: रेल्वेतील टॉयलेट यापुढे स्वच्छ असणार! रेल्वेने उचललं मोठं पाऊल

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा दुर्गंधीयुक्त आणि ओव्हरफ्लो टॉयलेटचा सामना करावा लागतो.

Updated: Jun 29, 2022, 04:35 PM IST
Indian Railways: रेल्वेतील टॉयलेट यापुढे स्वच्छ असणार! रेल्वेने उचललं मोठं पाऊल title=

Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा दुर्गंधीयुक्त आणि ओव्हरफ्लो टॉयलेटचा सामना करावा लागतो. या बाबतच्या तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे आणि सोशल मीडियावर केल्या जातात. मात्र इतकं करूनही त्या समस्या सुटण्याचं नाव घेत नाही. आता समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचललं आहे. देशभरातील गाड्यांची वैयक्तिकरित्या तपासणी करण्यासाठी रेल्वेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात केले आहे.

रेल्वेने सांगितले की, या समस्येवर मात करण्यासाठी, प्रवाशांना समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे बोर्ड स्तरावरील अधिकाऱ्यांना 24 तास विविध ट्रेनच्या 3 एसी डब्यांमध्ये प्रवास करण्यासाठी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. प्रथमच, रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसांत अधिकाधिक गाड्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. गेल्या तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून 544 टॉयलेटची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

रेल्वेने सांगितले की, सोशल मीडियावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींचा पूर आला आहे. टॉयलेटमध्ये पाणी नसणे, अस्वच्छता आणि गळती असणे. रेल्वेने या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा बैठका घेऊन समस्येचा आढावा घेतला.