पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 14, 2022, 05:16 PM IST
पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम title=

मुंबई : सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक  व्हिडिओ शेअर केले जातात. काही व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या महिलेचे धाडस पाहून प्रत्येक नेटकरी हैराण झाले आहेत. सापांच्या नावाने अनेकजण घाबरतात, तर असा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. 

या ट्रेंडिंग व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला सोफ्यावर बसलेली दिसत आहे. पण तिच्या बाजुला असलेला मोठा अजगर पाहून सगळ्यांनाच घाम फुटतो. महिला ज्या सोफ्यावर बसली आहे त्यावर अजगरही रेंगाळताना दिसत आहे. या व्हिडीओत पुढे बघायला मिळतंय की ही महिला बिनधास्तपणे मोबाईलवर काहीतरी वाचत आहे. महिला आणि साप पाहून असे वाटते की दोघेही एकमेकांना आधीच ओळखत आहेत. व्हिडिओच्या शेवटी जेव्हा कॅमेरा महिलेच्या हाताजवळ जातो तेव्हा महिलेच्या हाताभोवती साप गुंडाळलेला दिसतो. मात्र महिलेला दोन्ही सापांची भीती वाटत नाही आणि ती तिचा फोन वापरण्यात व्यस्त आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ 30 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. एवढेच नाही तर काही दिवसांतच हजारो लोकांनी  व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.