उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. या घटनेत दोन श्वानांचा लग्न सोहळा पार पडलाय. सर्वसाधारण लग्नाप्रमाणेच श्वानांचे हे लग्न लावण्यात आले होते. लग्नाची वरात, वरातीतील भन्नाट डान्स, नातेवाईक मंडळी अशा सर्वांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची आता एकच चर्चा रंगलीय.
हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ सुमेरपूर येथील दोन संत महंतांनी आपआपल्या श्वानांचे लग्न जमवले होते. यासाठी दोन्ही महंतांनी आपल्या शिष्यांना आणि हितचिंतकांना लग्नपत्रिका पाठवून समारंभासाठी आमंत्रित केले होते. लग्नाची जल्लोषात तयारी करण्यात आली होती.
वधूचे नाव कल्लू आणि वधूचे नाव भूरी आहे. वधू कल्लू या श्वानाची मनसर बाबा शिवमंदिरातून जल्लोषात वरात काढण्यात आली होती. सौंखर गावातील रस्त्यांवर ही वरात निघाली होता. या वरातीत अनेक नागरीकांनी डान्स केला. तब्बल 32 किलोमीटर अतिशय धुमधामात वरात काढत लग्नस्थळी पोहोचली होती.
कल्लूला वाढवणारे संत द्वारका दास सांगतात की, चित्रकूट या धार्मिक शहरात हा विवाह पार पडला. या लग्नाला जवळपास 100 वऱ्हाड्यांनी हजेरी लावली होती. मिरवणुकीचे सर्व विधी हिंदू रीतीरिवाजानुसार पार पडले. मिरवणूक थाटामाटात निघाली आणि द्वारचर, भवरे, काळेवाचे विधीही पार पडले.तसेच गेल्या आठवड्यात, तिलक विधी पूर्ण झाला, ज्यामध्ये 11,000 रुपये रोख अर्पण करण्यात आले.
लग्नाच्या दिवशी कुत्र्याला नवीन कपडे आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. वऱ्हाड्यांसाठी गोड-धोड जेवणही तयार करण्यात आले होते. असा हा अनोखा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला होता.