मुंबई: लग्न सोहळा धार्मिक विधीसह आनंदी क्षण असतो. नातेवाईक, मित्रमंडळीसह अनेक हितचिंतक लग्नसोहळ्याला हजेरी लावतात. वधुवरांचे मित्र या लग्न सोहळ्यात मजेशीर गोष्टी करताना दिसतात. भेटवस्तू देताना काही मजेशीर व्हिडीओ आपण आतापर्यंत पाहीले असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाययर होत आहे. यात वराचे मित्र वधुकडून एका करारावर स्वाक्षरी करून घेताना दिसत आहेत. या करारात वराच्या मित्रांनी मजेशीर अटी ठेवल्या आहे. या अटी वाचून तुम्हालाही हसू येईल.
वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. या पाच अटींवर वराच्या मित्रांची वधुकडून स्वाक्षरी करून घेतली आहे. लग्नातील अनोख्या कराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
या पाच अटी ठेवल्यानंतर सर्वात शेवटी वराची प्रत्येक गोष्ट निमुटपणे ऐकावी लागेल, असं लिहिलं आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या करारावर वधुने स्वाक्षरी केली आहे. हा व्हिडीओ simranbalarjain या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे.