डेलिव्हरी बॉयजचा रोमॅन्स फारच लाजीरवाणा, स्कुटरवरच सुरु झालं... व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा

या दोघांच्या रोमॅन्समुळे दिल्लीत चांगलीच हवा आहे.

Updated: Jul 18, 2022, 07:20 PM IST
डेलिव्हरी बॉयजचा रोमॅन्स फारच लाजीरवाणा, स्कुटरवरच सुरु झालं... व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा title=

मुंबईः हल्ली गावागाव सोशल मीडिया हे माध्यमं पोहचले आहे. त्यातून कुठे काहीही घडले की लगेचच ते सोशल मीडियावर व्हायरल होते. कोणी नाचाचा व्हिडीओ व्हायरल करत तर कोणी गाण्याचा. पण जर त्याच्यात अतरंगीपणा नसेल तर तो काही केल्या जास्त लोकांपर्यंत पोहचतंही नाही. 

दोन वेगवेगळ्या ब्रँडच्या (डोमॅटो आणि स्विगी) दोन डिलिव्हरी बॉईजमधील मैत्री इंटरनेटवर सध्या खूपच व्ह्यूज मिळवतं आहे. दिल्लीच्या गल्लीत हा प्रकार घडला. या दोघांच्या रोमॅन्समुळे दिल्लीत चांगलीच हवा आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून त्याला अनेकांनी नानाविध कमेंट्स दिल्या आहेत. 

"ब्रॉस बीइंग ब्रॉस" अशा नावाच्या काही कमेंट्स लोकं त्या व्हिडीओवर टाकत आहेत. सना अरोरा नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. व्हिडिओमध्ये स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉईज दोघेही एकमेकांच्या बरोबरीने स्कूटरवरून हातात हात घातलाना दिसत आहेत. 

त्या व्हिडीओत स्विगीचा एक एक्झिक्युटिव्ह स्कुटरवर आहे तर दुसरीकडे झोमॅटो डिलिव्हरी बॉय स्कूटरवर बसला आहे. व्यक्ती त्याच्या सायकलवर आहे. त्या दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला आहे आणि तोच हात पकडत ते दोघंही स्कूटर एकाच वेळी चालवत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पावसात फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर स्वार झालेल्या एका स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्विगीने तो व्हिडिओ सोशल हँडलवर पोस्ट केला होता.