Video : "चल इथून निघ नाहीतर..."; टीव्हीवरील चर्चेदरम्यान स्टुडिओतच फ्री स्टाईल हाणामारी

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला टीव्ही डिबेटमध्ये इंडियन मुस्लिम फाउंडेशनचे राष्ट्रीय प्रवक्ते शोएब जमाई यांच्यासोबत वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर जमाई यांना हा कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला आहे. 

आकाश नेटके | Updated: Jun 10, 2023, 05:10 PM IST
Video : "चल इथून निघ नाहीतर..."; टीव्हीवरील चर्चेदरम्यान स्टुडिओतच फ्री स्टाईल हाणामारी title=

Viral Video : 'द कश्मीर फाइल्स' आणि 'द केरला स्टोरी'नंतर आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित '72 हूरें' (72 Hoorain) या चित्रपटावरुन सध्या वाद पेटला आहे. एका विशिष्ट धर्मातून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरची कथा या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. या चित्रपटामुळे वाद इतका पेटलाय की, यावरुनच टीव्ही चॅनेवर सध्या चर्चासत्रे (TV Debate) सुरु आहेत. मात्र या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान टीव्हीवर हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

72 हूरें चित्रपटाच्या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शोएब जमाई यांची अँकरसोबत बाचाबाची झाली. एवढेच नाही तर यानंतर शोएब यांना शो सोडून जाण्यास सांगण्यात आले. हा वाद इतका पेटला होता की प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षा भारतीय वृत्तवाहिन्या उत्तम मनोरंजन देतात, असे कॅप्शनही प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं आहे.

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये, सुबुही खान आणि शोएब जमाई एका पॅनल डिस्कशनमध्ये वाद घालत असल्याचे दिसत आहे. दोघांमध्ये बाचाबाचीही होते. यानंतर शोएब जमाई यांना शो सोडण्यास सांगितले जाते. 72 हूरें चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच हा सर्व प्रकार घडला. ही टीव्ही चर्चा सुरू होती. सुबुही खान यांनी शोएब यांना मारण्यासाठी खुर्ची देखील उचलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. नंतर शोएब जमाई यांनी या घटनेबाबत एक लांबलचक ट्विट केले. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून आपल्यासोबत पॅनेलच्या सदस्यांनी गैरवर्तन केले. मात्र, मला हे प्रकरण लांबवायचे नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

शोएब जमाई हे इंडियन मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. याआधीही तो वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. असेच एकदा शोएबने बांगलादेशातील 25 कोटी, पाकिस्तानातील 25 आणि भारतातील 25 कोटी मुस्लिमांना एकत्र करून अखंड भारत बनवणार असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी स्पष्ट केले की मी हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण देत नाही.

72 हूरें चा टीझर समोर आल्यानंतर हा वाद पेटला आहे. टीझरमध्ये जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल भाष्य केले आहे. पण निर्मात्यांनी या हल्ल्यांच्या तारखांमध्ये मोठ्या तथ्यात्मक चुका केल्या आहेत. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मुंबईतील मोठा दहशतवादी हल्ल्यांच्या तारखांविषयी मेकर्सकडून मोठी चूक झाली आहे. त्यामुळे आता मेकर्स ट्रोलच्या निशाण्यावर आले आहेत.