अगरताळा : त्रिपूरा विधानसभा निवडणुकीसाठी डावे पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. १८ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने इंडीजीनस नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ त्रिपूरा (आयएनपीटी) म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्स ऑफ त्रिपूरासोबत आघाडी केली आहे.
त्रिपूरामद्ये एकूण ६० जागांसाठी निवडणूक होत आहे. तृणमूल काँग्रेसने ६० पैकी २४ जागांवर उमेदवर उभे केले आहेत. तृणमूलचे त्रिपूरातील प्रभारी आणि पश्चिम बंगालमधील आमदार सब्यासाची दत्त यांनी दावा केला आहे की, येत्या काळात त्रिपूरामध्ये तृणमूलला चांगले यश मिळेल. आमच्याकडे भाजप प्रमाणे पैसा नाही. पण, आम्ही टक्कर द्यायची तयारी केली आहे. दत्त यांनी म्हटले आहे की, त्रिपूरामध्ये पाय रोवण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्न करत आहे.
दरम्यान, त्रिपूरामध्ये तृणमूलची फारशी ताकत नाही. तो पक्ष तेथे अगदीच नगण्य आहे. त्यामुळे या राज्यात पाय रोवण्यासाठी तृणमूलला चांगलाच प्रयत्न करावा लागणार आहे.