भावा... काय नाचलास! डिलिव्हरी बॉयने रस्त्यामध्येच सुरु केला धमाल डान्स, पण Video पाहून लोकं संतापली

रिल्स बनवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Updated: Nov 10, 2022, 10:16 PM IST
भावा... काय नाचलास! डिलिव्हरी बॉयने रस्त्यामध्येच सुरु केला धमाल डान्स, पण Video पाहून लोकं संतापली title=

Delivery Boy Dance : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अनेक व्हिडिओ ट्रेंडिंगही (Trending Video) होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. हा व्हिडिओ काही जणांनी एन्जॉय केला तर काही जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ झोमॅटोच्या (Zomato) डिलिव्हरी बॉयचा (Delivery Boy) आहे. फूड डिलिव्हरी (Food Delivery) करताना या मुलाने रस्त्याच्या मध्येच आपली दुचाकी थांबवत इन्स्टा रील्ससाठी डान्स सुरु केला. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी करायला निघाला आहे. पण रस्त्याच्या मध्येच त्याने आपली दुचाकी थांबवी आणि डान्स सुरु केला. त्याच्या डान्स स्टेप्स बघण्यासारख्या आहेत. रिल्स बनवण्याचा त्याचा अंदाज काही लोकांना आवडला, पण काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही जणांनी त्याच्या डान्स स्टेपचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तर काही जणं म्हणतायत, आता कळलं ऑर्डर केलेलं जेवण आपल्यापर्यंत उशीरा का पोहोचतं? 

वाहतूक कोंडीत फसल्यामुळे आपली ऑर्डर उशीरा पोहोचत असेल असा आपण समज करुन घेतो. पण प्रत्यक्षात पण इथे काही वेगळंच सुरु असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. 31 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप ट्विटरवर चांगलीच व्हायरल झाली आहे, आतापर्यंत साडेसोळा हजारवेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय. तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर लाईक केलं आहे. 

हे ही वाचा : T20 World Cup : हे माँ.. माताजी... टीम इंडियाच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांना का आठवली दयाबेन

एका युजरने म्हटलंय याचा डान्स चांगला असला तरी जेवण थंड झालं त्याचं काय? तर एका युजरने त्याच्या टॅलेंटला सलाम केला आहे. दरम्यान हा मुलगा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे की केवळ रिल्स बनवण्यासाठी त्याने हा स्टंट केला आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.