VIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...

Viral Video :  देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.

Updated: Jan 16, 2023, 12:08 PM IST
VIDEO :  अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते... title=
Trending Video Soo Soo scandal man urinated on the lift button what happened next viral on Social media

Trending Video : नवीन वर्षाची सुरुवात ही एअर इंडिया (Air India) विमानातील दोन सू सू कांडने झाली. या घटनेनंतर (air india urination case) देशभरात एकच खळबळ माजली. या प्रकरणात रोज नवं नवीन खुलासे होतं आहेत. एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशीवर दारुच्या नशेत अंगावर लघुशंका (urine) केली. या घटनेनंतर चौकशीचे सत्र सुरु झाले. ही घटना ताजी असताना सोशल मीडियावर अजून एक किळसवाणा प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने चक्क लिफ्टमध्ये (lift) लघुशंका केली. त्याचं हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. 

काय आहे नेमकं प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण लिफ्टमधील बटणांवर लघवी करतो. त्याचं हे कृत्य जरी खोडसाळपणातून असलं तरी हे खूप धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार आहे. त्याचं हे कृत्य (elevator button peeing) लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्याचं हे कृत्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 

भोगा कर्माची फळ!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता, त्या तरुणाला त्याचा कर्माची फळं तिथेच भोगावी लागली. त्या तरुणाने लघुशंका केल्यानंतर काही क्षणात तो लिफ्टचं दार उघडायला गेला असता.  ते उघडलं नाही, तर त्या बटणांतून ठिणग्या उडताना दिसतं आहे. एवढंच नाही तर, लिफ्टमधील बल्बदेखील उडतो. त्या तरुणाने बटणांवर लघवी केल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि लिफ्टचा दरवाजाच उघला नाही. त्याने जे कृत्य जाणूनबुजून केलं त्याची शिक्षा त्याला त्याच क्षणाला भोगावी लागली. (Trending Video Soo Soo scandal man urinated on the lift button what happened next viral on Social media )

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ @HumansNoContext Twitter नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओतील तरुणावर ताशेरे ओढले आहेत.  या व्हिडीओवर एका यूजरने लिहिलं आहे की, तो खूप दारूच्या नशेत असामुळे त्याने हे कृत्य केलं आहे.