Fact Check : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो त्यांचं हे कृत्य पाहून प्रत्येक जण घाबरला आहे. तुम्हाला अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपट आठवतो. त्यात डॉक्टर असणारा शाहिद कपूर दारुच्या नशेत रुग्णाचं ऑपरेशन करतो. किंवा तुम्हाला 'मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील (Munna Bhai MBBS) तो सीन आठवतो का, ज्यात डॉ. अस्थाना (Dr. Astana) म्हणजे बोमन इराणी ऑपरेश करत असतो आणि मुन्ना भाई म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt ) अचानक ऑपरेशन थिएटरमध्ये येतो. या अशाप्रसंगी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णाच्या मनात काय सुरु असेल त्याचा जीवाचं काय याची कल्पनाही करणं कठीण आहे. खरं तर ऑपरेशन थिएटरमध्ये (Operation theater video) रुग्णासोबत असणारे डॉक्टर आणि काही सहकारी डॉक्टर नर्स काय करतात, तिथे काय काय होतं हे कायम चार भिंतीतच राहते. अनेक रुग्णांना बेशुद्ध केल्यामुळे त्यांनाही कल्पना नसते की, त्यांचासोबत काय होतं ते.
सोशल मीडियावर (Social media) अचानक एकाने व्हिडीओ (Viral Video ) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संतापजनक असा हा व्हिडीओमध्ये दोन डॉक्टर एकमेकांना शिवीगाळ (Doctor fight vidoe) करताना दिसतं आहेत. कुठला आहे हा व्हिडीओ आणि काय आहे या व्हिडीओमागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑपरेशन थिएटरमधील ओटी बेडवर एक रुग्ण आहे. त्याला सलाईन लावलेली दिसतं आहे. अशातच दोन डॉक्टर एकमेकांशी वाद घालताना दिसतं आहे. ऑपरेशन थिएटरमधील इतर डॉक्टर, नर्स त्यांना रुग्णाचा विचार करा आणि भांडण थांबवा. ते दोन डॉक्टर सगळं विसरुन फक्त एकमेकांना शिवागाळ करण्यात व्यस्त होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ ओटीमधील कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. (Trending Video Patient lying on operation theater bed and two doctors hassle verbal abuse Viral on Social media marathi news)
या व्हिडीओमागील सत्य तपासले असता, असं समजलं की हा व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तारिक फतहने @HasnaZarooriHai या अकाउंटवर हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचं म्हटलं आहे.
Verbal kalesh B/w Two Doctors While Operating Surgery pic.twitter.com/gkrddm9L7Z
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 4, 2023
तर हा व्हिडीओ चंदीगडमधील असल्याचा दावा पत्रकार ममता त्रिपाठी यांनी केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन आणि रिसर्च चंडीगढमधील आहे.
How does one country produce so many rectums?
How does Pakistan do it?Here surgeons in an operation theatre get into a heated argument with nursing staff. https://t.co/DRdNGPx6AV
— Tarek Fatah (@TarekFatah) January 4, 2023
सर्च केल्यानंतर या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. हा व्हिडीओ 31 ऑगस्ट 2017 मधील असून जोधपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती.
बेचारे मरीज़ का क्या हाल हो रहा होगा! जाने कितनी बार मर मर कर जिया होगा! डाक्टर साहिबान थोड़ा रहम कीजिए .. ये वीडियो #PGI, चंडीगढ़ का बताया जा रहा है…कबीर सिंह मत बनो यार लो reel थी, OT पर real मरीज़ है.. pic.twitter.com/eEhbh62xQ5
— Mamta Tripathi (@MamtaTripathi80) January 3, 2023
स्त्री रोग तज्ज्ञ अशोक नैनवाल ऑपरेशन करताना एनेस्थेटिस्ट मथुरा लाल टाक यांच्यासोबत वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार या वादानंतर रुग्ण महिलेने तिचं नवजात बाळ गमावलं होतं. त्यानंतर हे प्रकरण राजस्थान हायकोर्ट पोहोचलं होतं.