Live Trending Video : असं म्हणतात आपण प्रत्येक जण त्या देवाच्या हातातील एक बाहुली आहोत. तो कधी कुठल्या क्षणी काय खेळ खेळेल त्याची कोणालाही कल्पना नसते. जन्म आणि मृत्यू हा कोणाचा हातात नसतो. कोणी कुठे जन्माला येईल आणि कधी कोणाचं आयुष्याला पुर्नविराम लागेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालं आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या विचित्र घटनेनंतर आपण निशब्द होतो. सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ (viral video) नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतं आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती मेडीकल स्टोअरमधील दुकानदाराला ओआरएस (ORS) मागणी करत आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की, त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटतं आहे. दुकानदार त्या व्यक्तीला ओआरएस देणार तेवढ्यात तो व्यक्ती खाली कोसळली. त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (Heartattack Video) आला आणि अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीला यमराजाने गाठलं. मृत्यूचा हा थरार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यूचा असा लाईव्ह व्हिडीओ ज्या कोणी पाहिला, त्याचा आत्मा हादरला. (Trending Video Man dies of heart attack while taking medicine at medical store viral on Social media)
ही घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील आहे. संजय असं या व्यक्तीचं नाव असून तो 23 वर्षांचा होता. ही घटना बुधवारी संजय कॉलनी परिसरातील आहे. दरम्यान जेव्हा वेळी ही घटना घडली स्टोअर ऑपरेटरने या घटनेची माहिती 112 ला दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्याचा मृत्यू झाल्याचं उघड झालं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @tricitytoday या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 35.4K व्ह्यूज मिळाला आहे.
मौत की लाईव वीडियो सीसीटीवी में कैद फरीदाबाद में मेडिकल स्टोर पर ORS लेने गए युवक ने तोड़ा दम @police_haryana @FBDPolice pic.twitter.com/0YSlLXm4fX
— Tricity Today (@tricitytoday) January 5, 2023
यमराज आपल्याला कधी कुठे गाठेल याचा काही नेम राहिलेला नाही. म्हणून आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि या वर्षांचं संकल्प करा व्यायाम करा आणि हेल्दी फूड खा.