भारतीय सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर पाकिस्तानी सैन्याने ही धरला ताल, पाहा Video

आज इंडिया आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे सीमाभागात भारत आणि पाकिस्तान सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Aug 28, 2022, 05:39 PM IST
भारतीय सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर पाकिस्तानी सैन्याने ही धरला ताल, पाहा Video title=
trending video indo pak soldiers dancing on moosewala song viral video on social media and person life was saved watch video

Viral Video: "पंछी नदियां पवन के झोंके,

कोई सरहद न इन्हें रोकें,

सरहद इंसानों के लिए हैं,

सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के" रिफ्युजी चित्रपटातील हे गाणं देशभक्तगीत म्हणून सगळ्यांना माहिती आहे. अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेल्या या गाण्याने भारतीयांची मनं जिंकली होती. या गाण्यातील ओळी पूर्णपणे खऱ्या वाटता. सीमा हे फक्त मानवासाठी आहे. भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर हे दोन देश वेगळे झाले. 

आज इंडिया आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे सीमाभागात भारत आणि पाकिस्तान सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिवंगत गायक सिद्धू मूसवाला यांच्या गाण्यावर भारत-पाकिस्तान सैनिक डान्स करताना दिसत आहे. (trending video indo pak soldiers dancing on moosewala song viral video on social media and person life was saved watch video)

सीमेवर तैनात भारतीय जवान सिद्धू मुसेवालाच्या 'बंबीहा बोले' गाण्यावर नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान म्युझिक सिस्टिमचा आवाज जास्त ठेवण्यात आला आहे. यामुळे आवाज पाकिस्तानी चेकपोस्टपर्यंत जात आहे. गाण्याचे सूर ऐकून पाकिस्तानी सैनिकही स्वत:ला थरकरण्यापासून रोखू शकले नाहीत. या व्हिडीओतील दृश्य अनेकांचं मनं जिंकून घेतं आहे. 

29 मे रोजी दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली होती. अशोक स्वैन यांनी ट्विटरवर आपल्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शुक्रवारी शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ''समस्या लोकांची नाही, समस्या राजकारणाची आहे''. आतापर्यंत या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून मोठ्या संख्येने लोकांनी जवानांचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले आहे.