Trending News : कोणी तरी येणार येणार गं...! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Trending Viral VIDEO : ऐकावं ते नवलंच! अहो एका कुटुंबात सासूसून एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. एवढंच नाही तर माहेरी आई आणि आजीदेखील प्रेग्नंट आहे. 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Mar 18, 2023, 10:02 AM IST
Trending News : कोणी तरी येणार येणार गं...! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL title=
trending video Daughter Mother Grandmother and Mother In Law pregnant same time maternity photoshoot video viral on social media

Daughter Mother Grandmother and Mother In Law Maternity Photoshoot : गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक क्षण हा फोटो आणि व्हिडीओमध्ये कैद करण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाचे फोटोशूट अगदी प्रेग्नसी आणि मॅटरनिटी फोटोशूट याशिवाय लहानमुलांचे खास फोटोशूट असे अनेक प्रकार आज काल पाहिला मिळतात. सोशल मीडियावर प्री वेडिंग फोटोशूट मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. 

या फोटोशूटसाठी भन्नाट आयडिया शोधल्या जातात. मध्य तरी एक कपलचं प्री वेडिंग फोटोशूट खूप गाजलं होतं. त्यांनी चहा मळ्यात फक्त पांढऱ्या चादरीसोबत फोटो काढले होते. त्या प्रत्येक फोटोमध्ये कपल खूप रोमँटिक होताना दिसले होते. पण सध्या एक प्रेग्नन्सी फोटोशूट आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

ऐकावं ते नवलंच!

कोणी तरी येणार येणार गं...ही गोड बातमी कळली की घरात आनंदाचं वातावरण असतं. नवीन पाहुण्यासाठी घरात एकच उत्सुकता असते. या एका बातमीने घरात सगळ्यांचं प्रमोशन होतं. जी बायको असते ती आई होणार असते, नवरा बाबा, सासू-सासरे आजीआजोबा...कोणी मावशी, मामा, आत्या तर कोणी काका...आता त्या छोट्याशा तान्ह्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. 

अय्या पण हे काय!

अय्या पण या कुटुंबात नेमकं कोण कोण गूड न्यूज देतंय ते ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. सून सासू एवढंच नाही तर आई आणि आजीही गर्भवती आहे. 3 पिढ्यातील महिला एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. सासू सून आई आणि आजीने एकत्र बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

जिबिन जॉयने बाबा होणार आहे, हे कळल्यावर त्याचा आनंदाचा ठिकाणा नव्हता. जिबिन हा एक फोटोग्राफर आहे. त्यामुळे आपल्या बायकोचे मॅटरनिटी फोटोशूट करायचं असं त्याने ठरवलं. एक दिवस तो पिक्चर पाहत असताना त्याला या मॅटरनिटी फोटोशूटची भन्नाट कल्पना सूचली.  बायको चिंचू पीएस या फोटोशूटसाठी खूप उत्सुक होती. 

अन् हे काय...

अन् हे काय बायको, आई, सासू आणि आजी सगळे एकत्र गर्भवती झाल्या. या सर्व आनंदी जोडप्यानी बेबी बंपसोबत निसर्गात सुंदर पोझ दिल्या. हे व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित होत आहेत. 

खरं तर हटके फोटोशूटसाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला होता. इथे फक्त लेकच गर्भवती आहे. बाकी आई, सासू आणि आजीने उशी लावून या फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. आता हे हटके फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होतं आहे.