Disturbing Video: कारचा दरवाजा उघडला, तो चुकवायला गेला...पुढे जे घडलं ते मन विचलित करणारं, Video व्हायरल

Disturbing Video:  कारचा दरवाजा उडतो...हा दरवाजा चुकवायला हा बाईकस्वार जातो आणि....

Updated: Sep 29, 2022, 12:43 PM IST
Disturbing Video: कारचा दरवाजा उघडला, तो चुकवायला गेला...पुढे जे घडलं ते मन विचलित करणारं, Video व्हायरल title=
Trending video car bike truck accident videoViral on Social media nm

Trending video: सोशल मीडियावर (Social media) मन विचलित (Disturbing Video) करणारा एक व्हिडीओ ट्रेंड (Trending video) होतो आहे. अंगावर काटा आणणारा आणि सुन्न करणाऱ्या या व्हिडीओमधून प्रत्येकांने बोध घ्यावा. रस्त्यावर गाडी चालणारा प्रत्येक अगदी दुचाकीस्वार (bike rider) असो किंवा चारचाकी चालक (Four wheeler driver) यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कार चालकाच्या एका चुकीमुळे दोन बाईकस्वार यांचा जीव धोक्यात आला आहेत. कारचालकांकडून अनेक वेळा अशाप्रकारची चूक होतं. म्हणून त्यांनी हा व्हिडीओ पाहून यातून सर्तक व्हावं.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं...(shocking incident)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिवसाची वेळ आहे आणि रस्त्यावर वाहनांची वाहतूक सुरु आहे. दोन तरुण बाईकवरुन जातं असतात...पुढे काय होणार हे त्यांचा धानीमनी नसतं, अशात रस्त्याच्या शेजारी पांढऱ्या कारचा दरवाजा उडतो...हा दरवाजा चुकवायला हा बाईकस्वार जातो आणि....

आले ना अंगावर शहारे, धक्कादायक आणि थरारक असा अपघात फक्त चालकाच्या एका चुकीची शिक्षा या नाहक तरुणांना भोगावी लागली. कारचा दरवाजा चुकविण्यासाठी समोर येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली या तरुणाचं डोकं येतं...अपघातानंतर लगेचच चालक आणि इतर प्रेक्षक दुचाकीस्वाराच्या सहाय्यकाकडे धाव घेताना दिसतात. (Trending video car bike truck accident videoViral on Social media nm)

महत्त्वपूर्ण संदेश!

बेंगळुरू (Bangalore) पोलिसांनी (Police) महत्त्वाच्या संदेशासह सीसीटीव्ही (CCTV) फुटेज शेअर केले आहे. हा व्हिडीओ कला कृष्णस्वामी (Kala Krishnaswamy), आयपीएस डीसीपी ट्रॅफिक ईस्ट (IPS DCP Traffic East ) यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ते म्हणातात की, "कृपया तुम्ही तुमच्या वाहनाचे दरवाजे उघडत असताना सावध रहा आणि प्राणघातक अपघात टाळा." हा घटना कर्नाटकातील (Karnataka) आहे. त्यामुळे प्रत्येक कारचालकाने गाडीचा दरवाजा उघडताना सतर्क राहण्याची खूप गरज आहे. तुमची एक चूक इतरांच्या जीवावर उठू शकते.