'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात

Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.

राजीव कासले | Updated: Jun 5, 2023, 06:34 PM IST
'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात title=

Trending News: एखादा गुन्हा घडला किंवा त्रासदायक घटना घडली की नागरिक पोलीस स्टेशन (Police Station) गाठतात. पोलिसांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवतात. पण पोलिसांसमोर एक विचित्र तक्रार आली आणि याची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली. राजस्थानमधल्या दौसा (Rajashtan Dausa) जिल्ह्यातल्या सिंकदरा इथल्या गांगदवाडी गावात हे वित्रित प्रकरण घडलं. या गावात राहाणार एक तरुण थेट पोलीस स्थानकात पोहोचला. पोलिसात त्याने आपल्याला लग्न करायचं असून पत्नी हवी असल्याचं सांगितलं. तसंच आपल्या हाताने लिहिलेलं  एक पत्र त्याने पोलिसांसमोर ठेवलं. या पत्रात आपल्याला कशी पत्नी आहे याचा उल्लेख करण्यात आला होता. 

या पत्रात या तरुणाने आपल्याला लग्न करायचं असून त्यासाठी एक मुलगी हवी आहे असं लिहित काही अटीही ठेवल्या आहेत. आपली होणारी पत्नी ही गोरी, सडपातळ आणि 30 ते 40 वयोगटातील हवी अशा अटीही त्याने या पत्रात लिहिल्या होत्या. पुढे त्या तरुणाने आपली घरची परिस्थिती ठिक आहे, पण एकटेपणाचा कंटाळा आला आहे. घरातील कामं करण्यात असमर्थ आहे. त्यामुळे घरची दैनंदिन कामं करण्यासाठी आणि माझी सेवा करण्यासाठी पत्नीची गरज आहे असं लिहित त्याने पोलिसांना आपल्याला पत्नी (Wife) शोधण्यास विनंती करण्याची मागणी केली. 

सोशल मीडियावर पत्र व्हायरल
हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. यावर राजस्थान गांगदवाडी गावातील सीलमार्क आहे. पोलिसांनीही असं पत्र आपल्याची पृष्टी केली आहे. 

वधु-वराच्या मृत्यूने खळबळ
दरम्यान, उत्तरप्रदेशच्या बहराइच इथं एक धक्कादायक घटना समोर आली होती. मधूचंद्राच्या रात्री नवरा मुलगा आणि नववधूचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यावर दोन्ही कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला. नवरा मुलगा आणि नववधुचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं होतं. एकाचवेळी दोघांचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याच्या या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

30 मे रोजी 22 वर्षांच्या सुंदरचं लग्न 20 वर्षांच्या पुष्पा या मुलीशी झालं. 31 मे रोजी दोघांच्या मधुचंद्राची रात्र होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत दरवाजा बंदच असल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कुटुंबियांनी बेडरुमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला असता दोघांचेही मृतदेह बेडवर आढळले. दोघांच्या शरीरावर जखमेचे कोणतेही निशान नव्हतं. त्यांना कोणता आजारही नव्हता. दोघांचाही मृत्यू हार्टअटॅकने झाल्याचं निष्पन्न झालं. पण एकाचवेळी दोघांचाही हार्टअटॅकने कसा काय मृत्यू होऊ शकतो असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे.