Delivery Boy: इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी अगदी सहजसोप्या झाल्या आहेत. मोबाईलच्या एका बटणावर कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळू लागलीय. बँकेची कामं असू देत की ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) असू देत सोशल मीडियावर अनेक अॅप (APP) उपलब्ध आहेत. इतकंच काय तर आपल्याला खावेसे वाटणारे चमचमीत पदार्थही आपण घरबसल्या मागवू शकतो. कुठे ही न जाता कोणत्याही हॉटेलमधून आपल्याला हवी असणारी कोणतीही डीश काही मिनिटात आपल्या घरात उपलब्ध होते. ऑनलाऊन फुड डिलिव्हरी करणारे अनेक अॅप आहेत. या अॅपवरुन जेवण मागवताना आपल्याला प्रत्येकाला काही बरे-वाईट अनुभवही येतात. असाच एक वाईट अनुभव एका कुटुंबाला आला.
काय आहे नेमकी घटना?
एका शाकाहीर कुटुंबाने अशाच एका अॅपवरुन ऑनलाईन फूड (Online Food) मागवलं. मागवलेला पदार्थ वेळेत पोहोचलाही. पण जेव्हा या कुटुंबाने हा पदार्थ खाल्ला, तेव्हा त्याची चव त्यांना काहीशी वेगळी लागली. जेव्हा त्यांना सत्य कळल तेव्हा त्यांना धक्काच बसला. हा पदार्थ खाऊन घरातल्या एका व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्याला थेट रुग्णालायत दाखल करावं लागलं. याप्रकरणी त्या कुटुंबाने हॉटेल आणि डिलिव्हरी बॉयविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
कुटुंबाने मागवलं होतं चिली पनीर
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधली ही घटना आहे. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लखनऊमध्ये राहाणाऱ्या राकेश कुमार शास्त्री या व्यक्तीने आशियाना परिसरातील चंदर मार्केटमधील एका हॉटेलमधून चिली पनीरची ऑनलाईन ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन वेळेत शास्त्री यांच्या घरी पोहोचला. चिली पनीरचं (Chilli Paneer) पार्सल आल्यानंतर शास्त्री कुटुंबाने ते खायला सुरुवात केली. पण चिली पनीरची टेस्ट काहीळी वेगळी लागल्याने त्याने पनीर तपासून पाहिलं तर ते चिकन होतं. हॉटेलने चिली पनीरच्या ऐवजी चिकन चिलीचं (Chicken Chilli) पार्सल दिलं होतं. आणि तेच पार्सल डिलिव्हरी बॉयने शास्त्री यांना दिलं.
चिकन खाल्याने राकेश कुमार शास्त्री यांची तब्यात बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. शास्त्री यांचं कुटुंब हे शाकाहारी आहे. त्यामुळे चिकन खाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी त्यांनी हॉटेल आणि डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.