Tips To Fight Eve teasing : देशात प्रत्येक मुलीला कधी ना कधी या भयानक प्रसंगातून पुढे जावं लागतं. महिलांसोबत रोडरोमियोंकडून होणाऱ्या छेडछाडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशावेळी जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही कायम चिंतेत असता. कारण आपल्या मुलीला समाजात वावरताना छेडछाडीचा सामना करावा लागू नये. (trending news teach your daughter how to deal with eve teasing fight tips)
मुलगी घराबाहेर जाताना अनेक आया अगदी वडीलदेखील या सावली सारख्या त्यांचा सोबत असतात. पण तुम्ही असं वागून तुमच्या मुलीला खंबीरपणे संकटाशी लढायला नाही तर तिला कमजोर बनवितात. त्यामुळे मुलगी असलेल्या प्रत्येकाने आपल्या मुलीला या काही गोष्टी शिकवल्याच पाहिजे. मुलीने स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करायला हवं त्याबद्दल आपण बोलणार आहोत.
मुलींना जागृत करा!
पहिल्यांदा मुलीला काय चांगलं आणि काय वाईट हे सांगा. चांगल्या आणि वाईट स्पर्शाचा अर्थ त्यांना नीट समजवून सांगा. मुलीशी मनमोकळेपणे यासंदर्भात संवाद साधा.
मुलीला सतर्क बनवा!
तुमच्या मुलीला सदैव सावध आणि सतर्क राहायला शिकवा. मुलीला सांगा की सर्वप्रथम तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल जाणून घ्यायला शिकवा. आजूबाजूच्या लोकांच्या मनातील हेतू समजून घ्यायला शिकवा.
घटना लपवू नका!
अनेक पालक समाजाच्या भीतीपोटी मुलीला परिस्थितीसोबत तडजोड करायला सांगतात. पालकांनो दृष्यकर्म करणाऱ्यांना लोकांना कधी पाठीशी घालू नका. कारण आज तुमच्या मुलीसोबत घटना घडली आहे उद्या अजून कोणासोबत घडू शकते. त्यामुळे मुलीला स्वत: साठी लढायला शिकवा. घडलेली घटना मुलीने लपवू नये म्हणून तिच्यासोबत मैत्रीचं नातं ठेवा.
मुलींना कणखर बनवा!
मुलींना समाजात वावरताना कधी कुठे कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागेल, हे सांगता येत नाही. म्हणून अशावेळी मुलींना संकटाशी लढण्यासाठी सेल्फ सेफ्टीचे धडे द्या.
कायद्याबद्दल सांगा
मुलींना छेडछाड कायदा आणि पोलिसांबद्दल समजून सांगा. पोलीस कसे अशा लोकांना वटणीवर आणतात, याबद्दल मुलींना समजून सांगा. यामुळे मुलींचं मनोधैर्य वाढेल.
(Disclaimer: या लेखात दिलेले ज्ञान आणि सूचना सामान्य मान्यतांवर आधारित आहेत. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही. प्रथम संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)