Pre Wedding Photoshoot : सध्या प्री वेडिंग फोटोशूटचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. यासाठी डोंगर, नद्या, निसर्गरम्य ठिकाण किंवा एखाद्या हॉटेलमध्ये फोटोशूट केलं जातं. त्यामागचा उद्देश एकच असतो की ते फोटो पाहून आपल्याला आयुष्यभर ते क्षण जगता येतील. पण सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्री वेडिंगचा (Pre Wedding) एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. अगदी रोहित शेट्टीच्या सिनेमातील स्टंटला लाजवेल असं हे फोटोशूट आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे की लोक वारंवार त्याला बघत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक कपल प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसतंय. पण यासाठी त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधलीय. चक्क हवेत उडणाऱ्या दुचाकीवर वसून नवरदेव आणि नवरीमुलीने हे फोटोशूट केलं आहे. आता तुम्ही म्हणाल दुचाकी हवेत कशी उडेल? पण या कपलचं फोटोशूट करणाऱ्या कॅमेरामनने ते शक्य करुन दाखवलं आहे. नवरदेव आणि नवरीमुलीला दुचाकीवर बसवण्यात आलं आहे. ही दुचाकी एका कारवरुन उडत पुन्हा रस्त्यावर लँड होते. अगदी सिनेस्टाईल पद्धतीने हा चित्रीत करण्यात आलं आहे.
दुचाकी उडवण्यासाठी आयडीयाची कल्पना
दुचाकी रशीच्या सहाय्याने एका क्रेनला बांधण्यात आली आहे. क्रेनच्या मदतीने ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या एखाद्या सिनेमात शोभेल असाच हा सीन आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. प्री वेडिंग शूटसाठी काहीही केलं जाऊ शकतं असं युजर्सने म्हटलं आहे.
pre-wedding shoots - i’m getting this pic.twitter.com/Ynwf7Kxr6a
— Best of the Best (@bestofallll) October 27, 2022
पण काहींनी अस नसंत धाडस जीवावर बेतू शकतं अशी भीतीही व्यक्त केली आहे. जीव धोक्यात घालून असे व्हिडिओ बनवण्याची खरच गरज आहे का असं काही जण म्हणतायत, तर काही जणांनी या क्रिएटीव्हीटीचं कौतुकही केलं आहे.