Trending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?

Colours of Milestones : क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसणारे Milestones  वेगवेगळ्या रंगात दिसतात. या रंगांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Dec 21, 2022, 01:01 PM IST
Trending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?  title=
Trending news Do you know what the yellow, green Milestones on the side of the road mean and Knowledge News nmp

Knowledge News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला झाल्यापासून अनेकांना या रस्त्याने प्रवास करण्याचं स्वप्न आहे. सध्या मुलांना क्रिसमस (Christmas celebration) आणि न्यू इयरच्या (New Year 2022) सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही ना काही सेलिब्रेशन प्लॅन (Celebration Plan) करतात. अशात जर तुम्ही रस्त्याने कुठल्या शहरात जाणार असाल तर पहिले ही बातमी वाचा. खरं तर प्रत्येक गाडी चालवणाऱ्या (Driver) महामार्गावर दिसणाऱ्या माइलस्टोनबद्दल (Colours of Milestones) माहिती असलं पाहिजे.

कारने प्रवास करताना रस्त्यांच्या कडेला दिसणारे माइलस्टोनचे रंग वेगवेगळे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण याबद्दल जाणून घेऊयात. (Trending news Do you know what the yellow, green Milestones on the side of the road mean and Knowledge News)

 

पिवळा माइलस्टोन (Yellow Milestone)

तुमच्या प्रवासादरम्यान पिवळ्या रंगाचा मैलाचा दगड आला तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) जात आहात. महामार्ग एका राज्याला इतर राज्यांशी आणि शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि देखभाल केंद्र सरकारच्या जबाबदारीत येते.

हिरवा माइलस्टोन (Green Milestone)

प्रवासादरम्यान हिरवा मैलाचा दगड दिसला तर समजून घ्या की तुम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून त्या वेळी राज्य महामार्गावर (State Highway) पोहोचला आहात. भारतात, राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामार्गांना हिरवे माईलस्टोन आहेत. हे टप्पे बांधण्यापासून ते निगा राखण्यापर्यंतची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे.

 

हेसुद्धा वाचा - Indian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात

 

नारंगी माइलस्टोन (Orange milestone)

प्रवासादरम्यान तुम्हाला नारंगी रंगाचे माइलस्टोन दिसले तर समजून की तुम्ही गावातून जात आहात. हे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (Pradhan Mantri Gram Sadak Yojana) बांधले जातात. जवाहर रोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावागावात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर ऑरेंज रंगाचा वापर केला जातो.

 

हेसुद्धा वाचा -  Trending News : पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!

इतर रंगाचे माइलस्टोन

पिवळा, हिरवा आणि नारंगी रंगांव्यतिरिक्त, तुम्हाला काळा (Black), पांढरा (white) आणि निळा (blue) रंगाचे माइलस्टोन दिसतील. अशा स्थितीत, कुठेतरी प्रवास करताना या रंगांचे माइलस्टोन दिसले की समजा तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी तेथील महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची आहे.