VIDEO : अन् लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाची सुटली लुंगी, वऱ्हाडी हसून लोटपोट

Groom Bride Video : लग्नातील वधू वराचे अनेक व्हिडीओ आपल्याला आजकाल सोशल मीडियावर पाहिला मिळतात. लग्न म्हटलं की मजामस्ती, अनेक गंमतीदार किस्से घडतात. अशाच एका लग्नातील नवरदेवाची फजिती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   

Updated: Jan 21, 2023, 02:58 PM IST
 VIDEO : अन् लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाची सुटली लुंगी, वऱ्हाडी हसून लोटपोट title=
trending funny video Bride Groom wedding Groom lungi got loose What happened after that viral on social media

Trending Video : लग्न हा आयुष्यातील सुंदर क्षण...नवरदेव आणि नवरीसोबतच दोन्ही कुटुंबासाठी हा दिवस अगदी खास असतो. मेहंदी, हळदी सोहळ्यासोबत लग्नात नवरदेवाचे बूट चोरण्यापासून अनेक मजेदार प्रसंग होतं असतात. नवरीची लग्न मंडपातील एण्ट्रीचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. वधू वर एकमेकांसाठी खास डान्स करतात. या लग्न सोहळ्यात वधूवराचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. कधी कधी एखाद्या विधी करताना नवरीची किंवा नवरदेवाची फजिती होते. असाच एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायकर होतो आहे. 

अन् नवरदेवाची लुंगी सुटली

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन यांचं जागलेलं गाणं लुंगी डान्स तुम्हाला आठवतो का? यात लुंगी घालून त्यांनी डान्स केला आहे. अनेकांना लुंगी घ्यालायला आवडतं नाही, किंवा भीती वाटते. कारण तू सुटली तर आपली पंचाईत होईल. साइथ इंडियन विवाह सोहळ्यात लुंगी हे त्यांचा पारंपरिक पोषाख आहे. (trending funny video Bride Groom wedding Groom lungi got loose What happened after that viral on social media)

हसून व्हाल लोटपोट

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्न मंडपात वधू वराचे फेरे सुरु आहेत. आजूबाजूला फोटोग्राफ आणि वऱ्हाडी आहेत. फेरे सुरु होतात नवरदेवाची अचानक लुंगी सुटते आणि नवरदेवांची फजिती होते. लग्नात उपस्थित लोकही हसून लोटपोट होतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाची लुंगी सुटल्यामुळे नवरी लाजून लाल झाली. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर anjalirani010 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून हसू रोखू शकतं नाही आहे.