माकडाच्या हाती लागला लॅपटॉप, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

OMG! माकडाच्या हाती लॅपटॉप लागताच बनला सॉफ्टवेअर इंजिनियर?

Updated: May 21, 2022, 12:05 PM IST
माकडाच्या हाती लागला लॅपटॉप, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्रा किंवा मांजर यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण एकाने माकड पाळलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

माकडाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माकड आधी  झोपलेलं दिसतं नंतर घरभर फिरतं. शेवटची त्याच्या हाती लॅपटॉप लागतो. हा लॅपटॉप पाहून तो खूप खूश होतो. 

हे माकड लॅपटॉप उघडलून तो चालू करतो. त्यावर सर्च करतो आणि वेगवेगळे व्हिडीओ पाहातो. मग तो कंटाळतो आणि लॅपटॉप बंद करतो. नंतर काही वह्या आणि पुस्तकं घेऊन त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. 

माकडाचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड चिमुकल्या शेजारी झोपल्याचही दिसत आहे. कधी लॅपटॉप तर कधी वह्या-पुस्तकं तर कधी घरभर फिरून हे माकड आपला जीव रमवत असल्याचं दिसत आहे. शेवटी तो थकून झोपी जातो आणि तिथे व्हिडीओ संपतो. 

या माकडाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आतापर्यंत बऱ्याचदा कुत्रा-मांजरांचे असे क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण पाळलेल्या माकडाचा हा मजेशीर व्हिडीओ लोकांनाही खूप आवडला आहे. मस्तीखोर माकड अनेकांना आवडलं आहे.