नवी दिल्ली : देशातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने एक नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत प्रदूषण कमी होण्यासह देशातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याती योजना आखली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) ही योजना पुढे नेण्यासाठी तरुणांना ट्रेनिंग देत आहे. ट्रेनिंगदरम्यान चार्जिंग स्टेशनबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्यासोबतच काम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाविषयीही शिकवण्यात येणार आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दोन दिवसांचं ट्रेनिंग प्रोगाम चालवणार आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. स्वत:चं चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन सुरु करुन उत्पन्नाचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर ऍन्ड टेक्नोलॉजीअतंर्गत ट्रेनिंग प्रोग्राम दिल्लीत होणार आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ट्रेनिंग असणार आहे.
ट्रेनिंगमध्ये मॅकेनिज्म, सोलर पावर्ड इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशन टेक्नोलॉजी (solar powered electric vehicle charging station technology), इन्फ्रास्ट्रक्चर, बिजनेस, सोलर पीवी चार्जिंग कनेक्टिव्हिटी लोड्स, इलेक्ट्रिसिटी टॅरिफ आणि या व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती ट्रेनिंगदरम्यान देण्यात येणार आहे.
या ट्रेनिंगसाठी जाण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी १०० रुपये खर्च येणार आहे. शिवाय, ट्रेनिंगसाठी ६५०० रुपये फी असणार आहेत. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून सर्टिफिकेट देण्यात येईल. ट्रेनिंगसाठी आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्र आणि दोन पासपोर्ट साइज फोटो आवश्यक असणार आहेत.