काँग्रेस नेता हार्दिक पटेलला अटक, २४ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

 काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना २४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी 

Updated: Jan 19, 2020, 12:25 PM IST
काँग्रेस नेता हार्दिक पटेलला अटक, २४ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी एका खटल्याप्रकऱणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना २४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. अहमदाबाद जिल्ह्यातल्या विरामगम जवळ त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला होता. 

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गेल्यावर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१५ ला देशद्रोह प्रकरणी खालच्या न्यायालयात हजर न राहिल्याने शनिवारी गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाम तालुक्यातून त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आले. न्यायालयात सादर केल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त राजदिप सिंह गाला यांनी या संदर्भातील माहिती दिली. 

२५ ऑगस्ट २०१५ ला अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानात पाटीदार समाजाची आरक्षणाच्या समर्थनार्थ रॅली होती. या रॅलीनंतर राज्यातील अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि हिंसा झाली. क्राइम ब्रांचने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये हार्दिक पटेल आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती. राज्यात हिंसाचार पसरवणे आणि निवडून दिलेले सरकार पाडण्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x