Train Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण, खायची तुमची हिम्मत होणार नाही !

Vande Bharat Train Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसबाबतची. (Vande Bharat) तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात, तो पाहून यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कधीही वडा खायची तुमची हिम्मत करणार नाहीत. ( Indian Railways Food) 

Updated: Feb 5, 2023, 10:09 AM IST
Train Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण, खायची तुमची हिम्मत होणार नाही ! title=
Vande Bharat passenger bad quality food

Vande Bharat passenger bad quality food : धक्कादायक बातमी वंदे भारत एक्स्प्रेसबाबतची. (Vande Bharat) तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात, तो पाहून यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कधीही वडा खायची तुमची हिम्मत करणार नाहीत. ( Indian Railways Food) एका प्रवाशाने (Vande Bharat Express ) नाश्तासाठी वडा आणि समोसाची ऑर्डर केली होती. ( bad quality food) मात्र जो वडा या प्रवाशाला देण्यात आला, त्यातून चक्क तेल गळत होते. (Railway bad quality food)

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार या ग्राहकाने (Vande Bharat passenger) रेल्वेकडे केली आहे. IRCTC ने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमध्ये मिळणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार नेहमीच होते. जेवणाची किंमतही भरमसाठ असते. मात्र भरमसाठ पैसे मोजून आरोग्याला हानी पोहचवणारे असे खाद्यपदार्थ मिळत असल्यास घरचं जेवण घेऊन गेलेलंच बरं अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

एका प्रवाशाने ट्रेनमध्ये 'निकृष्ट दर्जाचे अन्न' दिले जात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या प्रवाशाने सांगितले की, हा व्हिडिओ वंदे भारत रेल्वेमध्ये शूट करण्यात आला आहे.  या क्लिपमध्ये प्रवासी रेल्वेमध्ये दिलेल्या जेवणातील खाद्यपदार्थातून तेल पिळताना दिसत आहे. प्रवाशाने कॅप्शनमध्ये दावा केला आहे की, वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांच्या किमती खूप जास्त असल्या तरी दर्जा खूपच कमी आहे.

केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षीपणे सुरु केलेल्या वंदे भारत रेल्वेमधील खाद्यपदार्थांची किंमत खूप जास्त आहे. जास्त पैसे मोजूनही निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविण्यात येत आहे. नाश्तासाठी देण्यात आलेले वडे आणि समोसे हे खूपच खराब आहे.  तळलेल्या या खाद्यपदार्थातून मोठ्या प्रमाणात तेल गळत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते हाताने पिळून दाखवतानाचा व्हिडिओ एका प्रवाशाने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.