Optical Illusion : 'या' फोटोत लपलेयत 12 पांडा, पाहा तुम्हाला ते शोधता येतात का?

हा प्राणी भारतात आढळत नाही, परंतु बऱ्याच लोकांना हा प्राणी फार आवडतो कारण तो फारच गोड आणि गोंडस दिसतो. तसेच तो मनमोहक देखील आहे.

Updated: Aug 8, 2022, 07:28 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलेयत 12 पांडा, पाहा तुम्हाला ते शोधता येतात का? title=

मुंबई : ऑप्टीकल इल्यूजन संदर्भात आपण अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहिले आहे. हे फोटो आपलं मनोरंजन करतात, तसेच ते आपल्या मेंदूला चालना देतात. जे खरंतर मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण रोजचं तेच तेच काम करुन कंटाळलेल्या आपल्या मेंदूला काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळतं तेव्हा तो जास्त जोरात काम करु लागतो. सध्या आम्ही एक ऑप्टीकल इल्यूजन फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये गोंडस पांड्या लपलेले आहेत. जे आपल्याला शोधून काढायचे आहे.

हा प्राणी भारतात आढळत नाही, परंतु बऱ्याच लोकांना हा प्राणी फार आवडतो कारण तो फारच गोड आणि गोंडस दिसतो. तसेच तो मनमोहक देखील आहे.

अशाच गोंडस पांड्याचा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यामधून तुम्हाला आणखी काही पांड्या शोधून काढाचे आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एकूण 12 पांडा लपले आहेत. परंतु बऱ्याच लोकांना फक्त तीनच दिसतात, पण आता तुम्हाला 30 सेकंदात शोधण्याचे आव्हान देत आहोत.

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा फोटो एक पेंटिंग आहे, ज्यामध्ये दोन मोठे पांडा आणि बेबी पांडा समोर बसले आहेत, परंतु तुमच्यासाठी आव्हान आहे की, पेंटिंगमधील उर्वरित पांडा अवघ्या 30 सेकंदात शोधायचा आहे. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला प्रतिभाशाली म्हटले जाईल. या आकर्षक आणि वैचित्र्यपूर्ण चित्रात पांडा शोधणे तुमच्या हृदयाचे ठोके एका सेकंदासाठी करू शकतात.

जर तुम्हाला अजूनही पांडा दिसला नसेल, तर आम्ही तुम्हाला शोधण्यात मदत करणार आहोत, पाहा फोटो.

आता तरी तुम्हाला या फोटोमध्ये लपलेले 12 पांडा दिसले असतील, आता हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा. त्यांना ते शोधता येतंय का?