जंगल सफारी पडली महागात, वाघानेच घेरलं अन्...

पर्यटकांचा जीव टांगणीला 

Updated: Dec 16, 2019, 06:17 PM IST
जंगल सफारी पडली महागात, वाघानेच घेरलं अन्... title=

मुंबई : अभयारण्यात पर्यटनासाठी गेलेला प्रत्येक पर्यटक आपल्याला वाघ दिसावा या आशेत असतो. पण जेव्हा हाच वाघ पर्यटकांचा श्वास रोखून ठेवतो तेव्हा... असंच काहीस छत्तीसगडच्या नवा रायपुर स्थित असलेल्या जंगलातील पर्यटकांसोबत घडला आहे. 

या जंगलात सफारी करता गेलेल्या 10 पर्यटकांचा श्वास जवळपास 1 तास रोखून राहिल्याची घटना घडली आहे. यावेळी पर्यटकांना असं वाटत होतं की, आपण मृत्यूशी दोन हात करत असेल.

 

तर झालं असं पर्यटकांना जंगलात फिरवणारं वाहन वाघाच्या क्षेत्रात अचानक बंद पडलं. ज्या ठिकाणी वाहन बंद पडलं त्याच ठिकाणी वाघांची रेलचेल सुरू होती. वाहनाला उभं बघून दोन वाघांनी वाहनाला घेरलं होतं. जे वाहन खराब झालं होतं त्यामध्ये लहान मुलं आणि बायका देखील होत्या. 

वाघमध्ये मध्ये डरकाळी देऊन पर्यटकांना घाबरवत होता. वाघांना बघायला गेलेले पर्यटक या एका तासात अतिशय शांत आणि बैचेन होऊन बसले होते. बंद पडलेल्या या गाडीला दुसऱ्या गाडीने खेचून बाहेर नेण्यात आलं. 

या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कानुसार पर्यटकांना सुरक्षा मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. प्रत्येकी एका पर्यटकाकडून 300 रुपये आकारले जातात. हे दर कमी करून आता 150 रुपये इतके केले आहेत. 

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये वाघाचे फोटो आणि घाबरलेल्या पर्यटकांचे फोटो आहेत. यावरून जंगल सफारीला जाणं सुरक्षित आहे का? असा सवाल देखील विचारला जात आहे.