Torrent Group: अनेक कंपन्या आपल्या सीएसआर अंतर्गत हजारो-लाखो रुपयांचा निधी सामाजिक संस्थांना देत असतात. पण 1-2 हजार नव्हे तर तब्बल 5 हजार कोटी कोणत्या कंपनीने दान केल्याचे कधी ऐकले आहे का? 5 हजार कोटी रुपये एखादी कंपनी जर दान करत असेल तर त्यांचे नेटवर्थ किती असेल? टोरंट ग्रुपने हे दान केलंय. विशेष म्हणजे हा निधी सीएसआर अंतर्गत देण्यात आला नाहीय. टोरंट ग्रुपचे अरबपती भाऊ सुधीर आणि समीर मेहता यांनी आता 5000 कोटी रुपये दान करण्याचा संकल्प केलाय. कोणाला दिलाय हा निधी? या निधीचा वापर कुठे केला जाणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टोरंट समुहाचा मेहता परिवार यूएनएम फाऊंडेशनला पुढच्या 5 वर्षात ही रक्कम दान करणार आहे. टोरंट ग्रुपने यासंदर्भात माहिती दिली. यूएनएम फाऊंडेशनचे नाव यू एन मेहता यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी टोरंट ग्रुपने हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे 5000 कोटींची आर्थिक रक्कम टोरंट ग्रुपच्या कंपन्यांच्या सीएसआरचा भाग नाही. त्याव्यतिरिक्त ही रक्कम दिली जाणार आहे.
टोरंट ग्रुप मॅनेजमेंटकडून देण्यात आलेल्या या दानाचा उपयोग विविध समाजपयोगी कामासाठी केला जाणार आहे.यूएनएम फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, कलेला चालना देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. टोरंट ग्रुपचे नेटवर्थ साधारण 5 हजार अरब डॉलर इतके आहे. मेहता परिवार आपल्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा टोरंट फार्मामधून घेतो.
टोरंट ग्रुपच्या कंपन्यांककडून देण्यात येणाऱ्या सीएसआर योगदानाच्या व्यतिरिक्त हा निधी असेल, असे कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. यू एन मेहताला कठीण प्रसंगात परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यावसायिक कौशल्य, सैद्धातिक जीवन आणि समाजकार्य वाढवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
1 एप्रिलपासून हे दान देण्यास सुरुवात केली जाणार आहे. यूएनएम फाऊंडेशनला 5 हजार कोटी रुपये म्हणजेच साधारण मिलियन डॉलर दिले जाणार आहेत. या ग्रुपची स्थापना 1959 मध्ये झाली होती.
टोरंट फार्मा लिमिटेडचा शेअर्स आज 2.83 टक्क्यांनी वाढून 2,674.15 च्या लेव्हलवर आहे. तर गेल्या 6 महिन्यांमध्ये कंपनीचा स्टॉक 42.22 टक्के वाढला. 6 महिन्याच्या कालावधीत या स्टॉकच्या किंमत 793.90 रुपये इतकी वाढ पाहायला मिळाली. तर वायटीडीमध्ये हा शेअर 16.45 टक्के वाढला.