मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग सातव्या वर्षी देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. बाल्केज आणि हूरुन इंडिया या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं जारी केलेल्या 2018 मधील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यादीतील माहितीनुसार देशात १ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या ८३१ व्यक्ती आहेत. त्याप्रमाणे देशाच्या सकळ घरगुती उत्पन्नापैकी २५ टक्के किंमतीची मालमत्ता या ८३१ जणांकडे एकवटली आहे.
यंदाच्या वर्षी १ हजार कोटींच्या वर संपत्ती असणाऱ्यांच्या यादीत २१४ जणांची भर पडली आहे. विशेष म्हणजे अतिश्रीमंतांच्या यादीत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. ओयेचे मालक २४ वर्षीय रितेश अग्रवाल यादीतल सर्वात तरुण व्यक्ती असून 'एमडीएच मसाले'चे मालक ९५ वर्षीय धर्मपाल गुलाटी हे सर्वात वृद्ध अतिश्रीमंत व्यक्ती आहेत.
1. रिलायंसचे मुकेश अंबानी 371,000 कोटी
2. एस पी हिंदूजा आणि परिवार 159,000 कोटी
3. लक्ष्मीनिवास मित्तल अँड फॅमिली 114,500 कोटी
4. विप्रोचे अजीम प्रेमजी 96,100 कोटी
5. दिलीप सांघवी 89,700 कोटी
6. उदय कोटक 78,600 कोटी
7. सायरस एस पूनावाला 73,000 कोटी
8. गौतम अडाणी एंड फेमिली 71,200 कोटी
9. सायरस पलोनजी मिस्त्री 69,400 कोटी
10. शापूर पलोनजी मिस्त्री 69,400 कोटी