टोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...

Satellite-Based Toll System: नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच टोल प्रणालीमध्ये बदल होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 28, 2024, 11:55 AM IST
टोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले... title=
Toll Replace with satellite toll system says union minister nitin gadkari

Satellite-Based Toll System: टोलसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा कायमची रद्द करण्याचा विचार करत आहेत. त्याच्या ऐवजी नवीन प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहेत. याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. या नवीन प्रणालीची फायदा कोणाला आणि कसा होणार, जाणून घेऊया. 

नितीन गडकरींनी सांगितलेली नवी प्रणाली ही सेटेलाइट आधारित असणार आहे आणि लवकरच ती सुरू केली जाणार आहे. मात्र, अद्याप या नव्या तंत्रज्ञानाची डेडलाइन समोर आलेली नाहीये. या नव्या प्रणालीअंतर्गंत, प्रवासी महामार्गावर जितक्या किमीवर प्रवास करतील तितकाच टोल त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. हा टोल टॅक्स थेट त्यांच्या बँक अकाउंटमधून कट करण्यात येणार आहे. यामुळं युजर्संना सेव्हिंगचीदेखील संधी मिळणार आहे. 

नितीन गडकरी यांनी डिसेंबरच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की, नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) चा प्रयत्न आहे की, मार्च 2024 पर्यंत नवीन सिस्टम जारी करणे. त्याच्या मदतीने टोलप्लाजावर लागणारा वेळ कमी करता येई शकतो. त्या दृष्टीने काम सुरू आहे. 

सध्या फास्टॅगचा वापर

सध्या टोल पेमेंटसाठी FASTag ही सिस्टिम आहे. ही एक इलेक्ट्रोनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे. ज्यामुळं ऑटोमॅटिक टोल प्लाझावर थेट टोलचे पेमेंट कट होते. यामुळं टोल प्लाझावर वेळेचे बचत होते. टोल प्लाझावर वेटिंग टाइम साधारण 47 सेकंद इतका लागतो. जो याआधी 714 सेकंद इतका लागत होता. 

फास्टॅग काय आहे?

Fastag ही एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे. यात Radio Frequency Identification (RFID) हे तंत्रज्ञान आहे. ज्याच्या मदतीने टोल प्लाझावर ऑटोमॅटिक टोल पेमेंट होऊ शकते. हे फास्टॅग वाहनाच्या विंड स्क्रीनवर लावले जाते. 

नितीन गडकरी पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

दरम्यान, नितीन गडकरी यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. नागपुरमधून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकिट दिले आहे. नितीन गडकरी यांनी कालच उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करना गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरीदेखील होत्या. यावेळी नागपुरात महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.