Google Doogle K.D.Jadhav: गुगल डूडलच्या माध्यमातून जगात मोठी कामगिरी बजावलेल्या लोकांच्या जन्मतिथी अथवा पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मानवंदना देण्यात येते. आजही गुगलनं मराठी मातीतल्या कुस्तीपटूला (Marathi Wrestler K.D.Jadhav) मानवंदना देण्यात आली आहे. परंतु हे मराठी लाल मातीतील कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव उर्फ के.डी.जाधव नक्की होते तरी कोण? त्यांच्या कार्याबद्दल यानिमित्तानं जाणून घेऊया. (todays google doodle k d jadhav who is khashaba dadasaheb jadhav who won 1st individual medal in olympic games in 1952)
भारतात असे अनेक नामवंत मराठी मातीतील खेळाडू होते आणि आहेत ज्यांचे नाव आज संपुर्ण जगात मानाने घेतले जाते. त्यांची जिद्द, गौरवकथा आणि मेहनत पाहून कुठलाही मराठी माणूस मोहित होऊ जातो. इतक्या नामवंत आणि प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये आवर्जून नावं घेतले जाते ते खाशाबा दादासाहेब जाधव यांचे. यांनी भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक (Khasaba Dadasaheb Jadhav 1st Olympic Medal) मिळवून दिले होते. खाशाबा दादासाहेब जाधवांची कथा इतिहासाच्या पानांतून कधीही पुसली जाणार नाही अशी त्यांची जगातिक कीर्ती आहे. या मराठी माणसानं भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक (1st Indivial Medal) जिंकले. 1952 च्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी कुस्तीत कांस्यपदक (Bronze Medal) जिंकला होता.
खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा येथे झाला. कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावात त्यांचा जन्म झाला. लोकप्रिय कुस्तीपटू दादासाहेब जाधव यांचे ते सुपुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षणही कराड येथून झाले. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत कुस्ती खेळायला सुरूवात केली होती. 1952 मध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांनी तीन वेळा फ्लायवेट चॅम्पियन निरंजन दासचा पराभव केला होता आणि ऑलम्पिक स्पर्धेतून पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवले होते. तेव्हा त्यांचे वय होते फक्त 27 वर्षे. इतक्या कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात (International Sports) त्यांनी इतिहास निर्माण केला होता. आज आपल्या भारतातले अनेक खेळाडू हे ऑलम्पिकचं काय मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाव कमावता दिसत आहेत परंतु के.डी.जाधव यांची ख्याती खूप मोठी आहे.
त्यांची प्रेरणा आजही अनेक कुस्ती पटूंना प्रेरित करते. त्यांना कूस्तीतील देवंही मानले जाते. आज त्यांचे सुपुज्ञ रणजीत जाधव त्यांच्या कुटुंबियांसमवेत गोळेश्वर येथे ऑलिम्पिक निवास या घरात राहतात. 1955 मध्ये ते पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आणि 1982 मध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना पेन्शनसाठी संघर्ष करावा लागला होता अशी त्यांच्याबद्दलची माहिती समोर येते. त्यांचे ऑलम्पिक करिअर 1948 मध्ये सुरू झाले होते.
त्यांचे जीवन त्यांच्या उतारवयात अत्यंत संघर्षमयी राहिले होते. क्रीडा महासंघाचे त्यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले होते आणि 1984 मध्ये त्यांचा दुर्दैवानं अपघाती मृत्यू (Accident) झाला तेव्हा मात्र त्यांच्या पत्नीला कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे या प्रतिभावान कुस्तीपटूची दखल फारशी घेतली गेली नाही त्यांचे नावंही विस्मृतीत जाऊ लागले. भारताचे पुढील वैयक्तिक पदक 44 वर्षांनंतर भारतात आले जेव्हा लिएंडर पेसने 1996 च्या क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर 2020 मध्ये नीरज चोप्राला (Neeraj Chopra) ते मिळाले.