Gold-Silver Price Today on 25 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चढ-उतारांचा काळ सुरू आहे. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळाली आहे. चला जाणून घेऊया 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्या-चांदीच्या किमती सराफा बाजारात किती रुपयांनी महागले आहेत...
bankbazaar.com नुसार सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल (24 मार्च) 55,730 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाणारे 22 कॅरेट सोने आज 55,930 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाईल. तर 24 कॅरेट सोने 58,520 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते ते आज 58,730 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाईल. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले; पाहा तुमच्या शहरातील दर
bankbazaar.com मते, चांदीच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. म्हणजेच 75,400 रुपये किलोने विकली जाणारी चांदी आज 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकली जाणार आहे. म्हणजेच आज एकूणच चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.