राशीभविष्य | सोमवार | २५ फेब्रुवारी २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 25, 2019, 08:38 AM IST
राशीभविष्य | सोमवार | २५ फेब्रुवारी २०१९ title=

मेष- गुंतवणूकीच्या बाबतीत सावध राहा. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळेल. करिअरच्या दृष्टीने निगडीत काही अडचणी दूर होतील. साथीदारासोबत प्रवासयोग आहे. भावनेच्या जास्त आहारी जाऊ नका. 

वृषभ- वेळीच सहकार्य न मिळाल्यामुळे चिडचीड होईल. लहानसहान गोष्टींवर रागवणं सोडा. कामाच्या बाबतीत काही अडथळे समोर येतील. आर्थिक वाद होण्याची चिन्हं आहेत. एकाग्रतेने प्रत्येक काम करा. 

मिथुन- मेहनत करावी लागेल. पण, त्याचा फायदाही तुम्हालाच होणार आहे. सहकाऱ्यांची मदत मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. नोकरी मिळण्यापासून बढती मिळेपर्यंत अनेक शुभवार्ता कळतील. 

कर्क- व्यापाराच्या निमित्ताने प्रवासयोग आहे. व्यापारत प्रगती होईल. कामात मन रमेल. मेहनतीचं फळ मिळणार आहे. नवी वाहन खरेदी कराल. 

सिंह- धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. कामाचा व्याप वाढेल. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाल. जुन्या गोष्टींवर हुज्जत घालू नका. 

कन्या- व्यापारात चढ- उतार होतील. पैसे उधार देण्यापासून सावध राहा. प्रेमाच्या नातेसंबंधाममधील तणाव दूर होण्याची चिन्हं. किचकट कामं टाळा. जुने आजार दूर होतील. 

तुळ- कामाच्या ठिकाणी अचानक धनलाभ होण्याची चिन्हं. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या गोष्टी कळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. महत्त्वाच्या लोकांची भेट घडेल. 

वृश्चिक- कामात अडचणी येतील. काही कामं अपूर्ण राहतील. नशीबाची साथही तशी कमीच असेल. नको त्या कामांसाठी धावपळ होईल. लहान मुलांसाठी चिंता कराल. ऋतुचक्रातील बदलामुळे आजारपण येण्याची चिन्हं. मानसिक संतुलन ठेवा. विचारपूर्वकपणेच बोला. 

धनु- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. दिवसभर व्यग्र असाल. देवाणघेवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. तुमच्याहून वयाने जास्त असणाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कोणता मुद्दा मांडत असाल तर सावध राहा. तुमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. 

मकर- काही कामांमधील बेजबाबदारपणामुळे तुम्ही त्रस्त राहाल. खर्च वाढेल. देवाणघेवाणीत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. जास्त काळजी करण्याची गरज नाही. खासगी आणि कौटुंबीक जीवनावर लक्ष द्या. साथीदाराची भावनिक साथ मिळेल. 

कुंभ- करिअर आणि पैशांच्या बाबतीत दिवस चांगला असेल. देवाणघेवाणीत काळजी घ्या. फायदा होण्याचीही चिन्हं आहेत. खर्च कमी करा. रोजच्या कामांवर लक्ष द्या. नवे बेत आखू शकता. इतरांच्या कामात डोकावू नका. आरोग्याची काळजी घ्या. लहान-सहान दुखापती होऊ शकतात. 

मीन- करिअर आणि पैशांच्या बाबतीत दिवस संमिश्र असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. रोजच्या कामांवर लक्ष ठेवा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी. 
- दीपक शुक्ल