Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?

Petrol-Diesel Price on 18 December 2022 :  पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

Updated: Dec 18, 2022, 08:47 AM IST
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?  title=

Today Petrol Diesel Price : रविवारी (18 December) तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (petrol diesel rate) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र वाहतूक आणि इतर कारणांमुळे काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय आहेत... (todya)

मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. 

दरम्यान आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी WTI क्रूड ऑइल दरात 1.82 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 2.17 टक्क्यांची घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर हा  79.04 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 74.29 डॉलर प्रति बॅरल इतका आहे.  

वाचा : रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा, कोणताही अडथळा येणार नाही

या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  •  दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  •  मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  •  चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

या राज्यात सर्वात महाग पेट्रोल 

> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
> परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
> नाशिक: पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर   

SMS द्वारे जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 

पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला एसएमएसद्वारेच कळू शकते. यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP<space>डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करावा लागेल. HPCL ग्राहकांनी HPPprice <space> DEALER CODE 92222 01122 वर पाठवणे आवश्यक आहे. तर, BPCL ग्राहकांना RSP<space>डीलर कोड 92231 12222 वर एसएमएस करावा लागेल.