Petrol-Diesel च्या दरात दिलासा…, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ-उतार दिसून येत आहेत. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) आज 14 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) अपडेट केले आहेत.

Updated: Aug 14, 2022, 09:18 AM IST
 Petrol-Diesel च्या दरात दिलासा…, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर       title=

Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. परिणामी पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ-उतार दिसून येत आहेत. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) आज 14 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) अपडेट केले आहेत. मात्र आज तेलाच्या दरात दिलासादायक बाब म्हणजेच तेलाचे दर स्थीर आहेत. 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या अधिकृत वेबसाइट, iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे.कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMS वरून तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.