‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.

Updated: Aug 28, 2017, 11:24 AM IST
‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट title=

झांसी : अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.

अशात दोघांपैकी एकाला रागात शांत राहणं जास्त गरजेचं असतं. सध्या सोशल मीडियात एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पती-पत्नी झांसीमधील घटस्फोट घेण्यासाठी आले होते. 

त्यांच्यात झालेल्या भांडणामुळे त्यांना इथे यावं लागलं. मात्र, या व्हिडिओत पती आपल्या पत्नीची कशाप्रकारे समजूत काढत आहे, हे बघायला मिळतंय. पतीने रागावलेल्या पत्नीला समजवण्यासाठी चक्क सर्वांसमोर एक गाणं गायलं आहे. पतीने ‘बदलापूर’ सिनेमातील ‘ना सीखा मैंने जीना’ हे गाणं गात पत्नीला मनवलं आहे. पतीने गाणं गायला सुरूवात केली आणि पत्नी रडायला लागली. पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. 

पतीच्या या आयडियाच्या कल्पनेमुळे पत्नीने लगेच राग सोडला. त्यानंतर झालेला आनंद दोघांच्याही चेह-यावर स्पष्ट दिसतो आहे. पत्नीने त्या गाण्यातील भावना समजून घेतल्या. त्यानंतर काही वेळातच दोघेही एकत्र घरी गेले. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी हा सगळा प्रकार पाहून टाळ्या वाजवायला सुरूवात केली.